बारावीनंतरच पदवीसोबत यूपीएससी-एमपीएससीची तयारी; एमआयटी-एडीटीचा अभिनव बी.ए. (अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), बँकिंग, कर्मचारी निवड आयोग (SSC) तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी शिक्षणासोबतच करता यावी, या उद्देशाने एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (SICS) ने बी.ए. (अॅडमिनिस्ट्रेशन) हा अभिनव अभ्यासक्रम सुरू केला आहे.

याबाबत माहिती देताना स्कूलचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी सांगितले की, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण होईपर्यंत स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करता येणार आहे. या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना, सार्वजनिक प्रशासन, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, भू-राजकारण, सुशासन, सार्वजनिक धोरण, सार्वजनिक वित्त, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, शाश्वत विकास, डिजिटल प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), पर्यावरणीय धोरणे, चालू घडामोडी, विश्लेषणात्मक विचार, तार्किक क्षमता, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास, उत्तरलेखन आणि मुलाखत कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, उत्तरलेखनाचा सराव, मुलाखत प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळ, खर्च आणि अतिरिक्त कोचिंगची गरज कमी होऊन स्पर्धा परीक्षांमधील यशाची शक्यता वाढणार असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी www.mitsics.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ९६०७५८००५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, १८ व १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हॉटेल प्रथम, व्हीआयपी रोड, सोलापूर येथे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहणार आहेत. प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, "यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांतून कौशल्याधिष्ठित, मूल्याधिष्ठित आणि सामाजिक जाण असलेले अधिकारी प्रशासनात यावेत, तसेच राष्ट्रउभारणीत त्यांचे मोलाचे योगदान असावे, हा आमचा उद्देश आहे."