संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी साहित्य मंडळाचा उत्साहात शुभारंभ
संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त), सोलापूर येथील इंग्रजी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी
इंग्रजी साहित्य मंडळाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १५ जुलै
२०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रा. डॉ. आर. पी. बुवा यांनी मार्गदर्शन केले, तर
अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. जे. मोहरकर उपस्थित
होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. पी. आर. वाघमारे (इंग्रजी विभाग, ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय,
सोलापूर) यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा, साहित्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि वाचनसंस्कृतीचे
महत्त्व पटवून दिले. त्यांनी साहित्य, संतपरंपरा, मानवी मूल्ये आणि समाजातील साहित्याची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन करत
विद्यार्थ्यांनी व्यापक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. यावर्षी इंग्रजी
साहित्य मंडळाची "Celebrating Literary Legacies" ही संकल्पना जाहीर करण्यात आली. या अंतर्गत जागतिक साहित्यविश्वातील
नामवंत साहित्यिक व विचारवंत Walter Benjamin, Iris Murdoch, Badal
Sircar, Jacques Derrida, Manohar Malgonkar, Henry David Thoreau आणि Northrop Frye यांच्या साहित्यिक
योगदानाचे स्मरण करण्यात आले. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अमिताव घोष आणि
नोबेल पुरस्कार विजेते वोले सोयंका यांनाही अभिवादन करण्यात आले.
यावेळी इंग्रजी विभागाच्या "Release
of Excellence – Issue I" या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख
पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, सर्जनशील लेखन, भाषिक कौशल्ये आणि इंग्रजी
भाषेबद्दलची आवड निर्माण करण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची
माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. एम. हालोळी
यांनी केले. सूत्रसंचालन कु. सानिया नायडू यांनी, तर
आभार प्रदर्शन कु. हर्षदा बुधले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी
आयोजनासाठी इंग्रजी विभागातील प्राध्यापक व आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष
परिश्रम घेतले.