मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मध्य पूर्व मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम आणि मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष नागेश खरात यांच्या पुढाकारातून शहरातील विविध भागांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. अशोक चौक येथील बोली मंगल कार्यालय, दाजी पेठ येथील पूर्व विभाग श्रीराम मंदिर तसेच जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासह विविध ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे आयोजित शिबिरात युवकांचा विशेष सहभाग दिसून आला. रक्तदान करून नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची माहिती नगरसेवक विनोद भोसले आणि मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष नागेश खरात यांनी दिली.

या महारक्तदान शिबिरासाठी हेडगेवार रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.