डिजिटल ऑईल पेन्टिंग क्षेत्रात मोठी झेप; ‘जगदिश ग्राफिक्स अँड ऑईल पेन्टिंग प्रा. लि.’ लवकरच सेवेत
औरंगाबाद येथील युवा उद्योजक जगदीश यांच्या नेतृत्वाखाली
डिजिटल ऑईल पेन्टिंग, फोटो रिस्टोरेशन आणि ग्राफिक्स डिझाईन
क्षेत्रात कार्यरत असलेल्या टीमने महत्त्वाची झेप घेतली आहे. 700 हून अधिक समाधानी ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर ‘जगदिश ग्राफिक्स अँड ऑईल पेन्टिंग प्रा. लि.’ या
नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली असून, तिचे भव्य उद्घाटन
लवकरच होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक
डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहक
समाधान या तत्त्वांवर आधारित सेवा देत कंपनीने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली
आहे.
कंपनीमार्फत जुन्या छायाचित्रांचे नूतनीकरण (Photo
Restoration), HD डिजिटल ऑईल पेन्टिंग, फोटो
एडिटिंग, कस्टम ग्राफिक्स डिझाईन, डिजिटल
आर्ट आणि इतर आधुनिक ग्राफिक्स सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सेवांना
ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले. नव्या कंपनीच्या
माध्यमातून अधिक आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाच्या सेवा आणि
ग्राहकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आगामी काळात प्रीमियम
डिजिटल ऑईल पेन्टिंग, फोटो रिस्टोरेशन आणि डिजिटल आर्ट
क्षेत्रात विविध नवे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
यावेळी संस्थापक जगदीश यांनी सांगितले की, "700
हून अधिक ग्राहकांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास हीच आमची सर्वात
मोठी ताकद आहे. नव्या कंपनीच्या माध्यमातून अधिक दर्जेदार, आधुनिक
आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील." कंपनीच्या उद्घाटनाची तारीख तसेच आगामी विशेष उपक्रमांची माहिती लवकरच
जाहीर करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.