बंगळुरूमध्ये महिला डॉक्टरचा गूढ मृत्यू उलगडला — पती डॉक्टरनेच दिलं ‘प्रोप्रोफोल’ इंजेक्शन; हत्या उघडकीस!

कर्नाटकची राजधानी बंगळुरू हादरवणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी डॉ. महेंद्र रेड्डी (व्यवसायाने सर्जन) याला अटक केली आहे. त्याच्यावर आपल्या पत्नी डॉ. कृतिका एम. रेड्डी (वय २९) हिच्या हत्येचा आरोप आहे. २४ एप्रिल २०२५ रोजी कृतिकाचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला होता. सुरुवातीला आत्महत्येचा संशय घेतला गेला, परंतु पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये ‘प्रोप्रोफोल’ नावाचे शक्तिशाली अॅनेस्थेटिक औषध तिच्या शरीरात आढळल्याने पोलिसांना हत्येचा संशय आला.

पोलिस तपासातील उघडकी:

बंगळुरू पोलीस अधीक्षक सीमांत कुमार सिंह यांनी सांगितले की —

डॉ. महेंद्रने वापरलेले औषध बेकायदेशीररित्या हॉस्पिटलमध्ये साठवले होते. तपासादरम्यान त्याच्याविरोधात फसवणूक आणि धमकावणे यासारखे जुने गुन्हेही समोर आले आहेत.”

त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता (IPC) 2023 च्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी सिद्ध झाल्यास त्याला आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.

 घटनेचा क्रमवार तपशील:

·         २६ मे २०२४: महेंद्र आणि कृतिका यांचं लग्न होतं.

·         २१ एप्रिल २०२५: महेंद्रने पत्नीला ‘पोटदुखी’च्या कारणावरून IV इंजेक्शन दिलं आणि तिला माहेरी पाठवलं.

·         २३ एप्रिल: महेंद्र पुन्हा सासरी पोहोचला आणि आणखी एक इंजेक्शन दिलं.

·         २४ एप्रिल: सकाळी कृतिका बेशुद्ध अवस्थेत सापडली.

·         डॉक्टर असूनही महेंद्रने सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) देण्याचा प्रयत्न केला नाही.

·         तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

 कुटुंबाचा आक्रोश:

कृतिकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मागणी केली आहे —

आमच्या मुलीला न्याय मिळावा. महेंद्र रेड्डीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी.”

 पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास:

महेंद्र रेड्डीचा जुळा भाऊ डॉक्टर नागेंद्र रेड्डी याच्यावरही फसवणूक आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आता या दोघांच्या रुग्णालयातील औषधसाठ्याचाही तपास करत आहेत.

 IPC 2023 कलम 103 — शिक्षा:

या कलमांतर्गत पूर्वनियोजित हत्या” केल्यास आरोपीला आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते.