दोनाचे चार आणि चाराचे झाले सहा

राष्ट्रवादीची दोन शकले
राष्ट्रवादीत अजित पवार गटाने सख्खे काका शरद
पवारांविरोधात जुले २०२३ मध्ये बंड केले. फेब्रुवारी २०२४ ला निवडणूक आयोगाने अजित
पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
गट अधिकृत पक्ष बनला. अजित पवारांना पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडाही मिळाला. यावर्षीच अजित
पवार राष्ट्रवादीचे अधिकृत अध्यक्ष बनले.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनीही शिवसेनेचे दोन तुकडे
केले होते. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीचे दोन पक्ष केले. या वर्षाच्या
मध्यावर म्हणजेच एप्रिल- में मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीत सहा
पक्षांनी दंड थोपटले. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित
पवार गट, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट अशा तीन-तीन
पक्षांत लढत झाली. लोकसभेला मविआची जादू दोनाचे चार आणि चाराचे झाले सहा दोन
निवडणुकांचे दोन परिणाम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या
फुटीला भाजपला जबाबदार परले. विशेष म्हणजे, भाजपचा कारनामा
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांपर्यंतही पोहोचवला. त्याचा मोठा फटका लोकसभा
निवडणुकीत बसला. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. त्याउलट महायुतीतील
भाजपला ९, शिवसेना शिंदे गटाला ७ तर अजित पवार गटाला फक्त एक
जागा जिंकता आली.
लोकसभेचा फटका बसलेल्या महायुतीने मतदारांच्या नाराजीची
कारणे शोपली. त्यानंतर महायुतीने घोषणांचा पाऊस पाडला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, मोफत
शिक्षण, महिलांना ५० टक्के सवलतीत प्रवास, कृषिपंपाची वीज मोफ्त अशा घोषणा केल्या गेल्या. २० नोव्हेंबरला
विधानसभेसाठी मतदान झाले, आणि निकालानंतर सगळेच बातावरण
बदलले. सहा महिन्यांपूर्वी ज्या मतदारांनी मविआला हवेत नेले होते, त्याच मतदारांनी त्यांना पुन्हा जागेवर आणले.
महायुतीची घोडदौड
खऱ्या खोट्या शिवसेनेचा मुदा, खऱ्या-खोट्या राष्ट्रवादीचा मुरा, अदानी प्रकरण,
संविधान बदलावा मुद्या, जातिनिहाय जनगणनेचा
मुद्दा, मराठा आरक्षण या सगळ्या मुख्यांना महायुतीने
उत्तमरीत्या तोंड दिले. निकालानंतर भाजपने १३२, शिवसेना
शिंदे गटाने ५७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा
जिंकल्या. विरोधी महाविकास आघाडीला तिन्ही पक्ष मिळून अर्धशतकही करता आले नाही.
शिवसेना यूबीटीला २०, काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादी एसपीला
१० जागांवर समाधान मानावे लागले.
वर्षाखेरीस नया मुख्यमंत्री
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये, महाराष्ट्रात सतेचा खेळ रंगलेला दिसला. मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे गट अजून
बसला. मात्र, भाजपने १३२ जागा जिंकल्याने हे पद अखेर
भाजपकडेच राहिले. निकालानंतर तब्बल १० दिवस तू-तू में- मैंचा खेळ रंगला. अखेर पाच
डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. अजितदादा विक्रमी सहाध्यांदा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ठरले