जबाबदारी आता वाढली

जबाबदारी आता वाढली


दोन वर्षात महाराष्ट्रातील दोन गावे एकदम देशाच्या नकाशावर तळपली आहेत. त्यातील पहिले गाव आहे अंतरवाली सराटी.

मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणासाठो उपोषण सुरू असताना त्यावर पोलिसांनी हल्ला केला आणि अंतरवालो सराटी हे गाव अख्ख्या भारतात प्रसिध्द झाले. तसेच दुसरे गाव गेल्या आठवड्यापासून देशात सर्वांच्या नजरेत MIRVACHAN SADAN नाव आहे मारकडवाडी. सोलापूर जिल्ह्यातील भारत निर्वाचन आयोग माळशिरस विधानसभा ELECTION COMMISS मतदारसंघातील OF हे छोटेसे गाव आहे. येथील मतदारांची INDIA संख्याही २ हजार ४०५ आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे गाव अचानक प्रकाशझोतात आले. वास्तविक माळशिरस मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि माजी आमदार राम सातपुते यांचा पराभव केला आहे.

निर्वाचन सदन भरले आहे. या गावाचे मात्र, विजयी होऊनही जानकर यांना अपेक्षित आघाडो मारकडवाडी या गावातून मिळाली नाही. त्यामुळे ग्राम स्थांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. एवढेच नाही तर बॅलेट पेपरवर तीन डिसेंबर रोजी पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खूप काही घडले आणि जिल्हा प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान होऊ नये म्हणून आटापिटा केला आणि ग्रामस्थांची ही संपूर्ण प्रक्रिया बंद पाडलो. मुळात विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर चहू‌बाजूंनो ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात असतानाच महाराष्ट्रातील एका गावात ईव्हीएममधील मतांची चाचपणी करण्यासाठी वॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा घाट घालणे हा संशयकल्लोळचा दुसरा भाग म्हणावा लागेल. मुळात महाविकास आघाडीतील नेत्यांसह अनेकांनी आणि बहुतांश मतदारांनीही विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची जवाबदारी आता वाढली आहे. म्हणूनच ईव्हीएम मॅनेज होऊ शकत नाही, हॅक होऊ शकत नाही हे छातीठोकपणे सिध्द करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. या आरोपांना चोख उत्तर द्यायचे असेल तर ईव्हीएम हॅक होऊ शकते, असा आरोप करणाऱ्यांनाच निवडणूक आयोगाने संधी देऊन सिध्द करण्यास सांगावे. आपल्या देशात असंख्य सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत. त्यांचेही मत याबाबत विचारात घेणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त होणे, अविश्वास दाखवणे हे मतदारांच्या, राजकीय पक्षांच्या आणि देशाच्याही हिताचे नाही. त्यामुळे आता सुरू झालेल्या संशयकल्लोळाच्या दुसऱ्या भागावर कायमचा पडदा टाकण्याची गरज आहे.