पनवेल येथे साकारणार देशातील पहिले 'एआय' विद्यापीठ पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार सुरू बांगरगणी घेऊन टाक

मुंबई : माणसाच्या बुद्धिमत्तेलाच आव्हान देऊ पाहणारे आणि मानवी जीवनावर मुलाखत बदल घडवून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बाबत राज्य सरकारने अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे विद्यापीठाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे अशी घोषणा खुद्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मुंबईत केली. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विद्यापीठ महाराष्ट्रातील पनवेल येथे स्थापन करण्यात येणार आहे. जुलै २०२६ मध्ये हे विद्यापीठ प्रत्यक्षात सुरू करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. पहिली बॅच सुमारे २०० विद्यार्थ्याची असणार आहे. विकसित भारत २०४७ मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करावी अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करावी अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. अत्याधुनिक संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आधुनिक माहिती तंत्रज्ञान व जागतिक स्पर्धेत टिकून ठेवणारे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ) लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अधिक गती देण्यासाठी एक विशेष कृती दल (टास्क पर्ट्स) स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समावेश करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार म्हणाले.