ठाकरेसेनेचे स्वबळाचे नारे
.jpeg)
• सोलापूर
प्रशांत जोशी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. ठाकरेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या. सोलापूर जिल्ह्यातही आघाडीचेच खासदार निवडून आले. सोलापुरातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, माजामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील तर पाराशीवमपून ठाकरेसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र उलटे झाले. मतदारांनी लोकसभेला ज्या भाजपला सोलापूर जिल्ह्यातून हदपार केले होते त्याच भाजपचे पाच आमदार विधानसभेवर निवडून पाठविले. हे आमदार मतदारांनी नव्हे तर ईव्हीएमने निवडून दिले आहेत असा आरोप विरोधी पक्ष करत असला तरी आता याच भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याর महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळाचे खातेवाटपही करण्यात आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फक्त चार महिन्याने अंतर होते. या चार महिन्यात राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होणार असा प्रश्रस सामान्य नागरिकांना पडला आहे. लोकसभेला एकत्र लढलेली महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी वेगवेगळ्या वाटेने का गेली, अशाही शंका उपस्थित होत आहेत. ३१ खासदार असलेल्या महाविकास आघाडीने १७० ते १८० जागा मिळतील असा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात पत्रास जागांचेही दान पदरात पडले नाही. लोकसभेच्या यशाची हवा तीनही पक्षातील नेत्यांच्या डोक्यात गेल्यामुळे अशी दयनीय अवस्था झाली का, असाही प्रत्र महाराष्ट्राला पडला असेल.
या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा सूर आघाडीत उमटू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपापासून ते उमेदवार जाहीर होईपर्यंत आघाडीत एकवाक्यता नव्हती. उमेदवार निश्चित झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. प्रचाराचा झंझावात दिसला नाही. विजयासाठी आवश्यक असणारे सूक्ष्म नियोजन पाहायला मिळाले नाही. परिणामी आघाडीच्या पदरात निराशेचे दान पडले. एकीचे बळ लोकसभेत यश देऊन गेले याचा आघाडीला विधानसभा निवडणुकीत विसर पडला असावा, अशी चर्चा राज्यभर सुरु आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेच्या जागा आहेत. शहर उत्तर वगळता अन्यत्र महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळाले. यामुळेच त्या निवडून आल्या. ते मताधिक्य विधानसभा निवडणुकीत दिसले नाही. आघाडीतील घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांचीही अशीच मानसिकता तयार झाली आहे. कार्यकत्यांच्या या भावनांची दखल वरिष्ठ पातळीवर कप्ती घेतली जाते त्यावर अंतिम निर्णय अवलंबून आहे.
सोलापूर महापालिकेची निवडणूक कधी होणार माहीत नाही. महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा ठराव विधानसमेत नुकताच पारित केला आहे. जनगणना, ओबीसी आरक्षण या मुद्यांवर अद्याप चर्चा नाही. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने कधी स्वतंत्रपणे तर कयी भाजपशी युती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता शिवसेनेने फार चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले नाही. गेल्यावेळी प्रथमच २१ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी महेश कोठे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेले तर देवेंद्र कोठे भाजपत जाऊन आमदार झाले. कोठे यांनी निवडून आणलेल्या अन्य आठ दहा नगरसेवकांनी शिवसेनेला यापूर्वीच जय महाराष्ट्र केला आहे. अशी राजकीय पार्श्वभूमी असताना ठाकरेसेना स्वबळाचे नारे देत आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचे विभाजन झाले. शिंदेसेना उदयास आली. आज हा पक्ष सत्तेत आहे. केंद्रात आणि राज्यात या पक्षाचे मंत्री आहेत. महापालिकेत आपले नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. विधानसभा निवडणुकीच्यावेळी या पक्षाला २५ जागा सोडण्याचा शब्द भाजपने दिला आहे. त्यांनी तो पाळला तर शिंदेसेना चांगले यश मिळवू शकेल आणि महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर मानाचे पानही मिळेल. अशावेळी स्वतंत्र निवडणूक लढून महाशक्तीवर विजय मिळवण्याचे आव्हान ठाकरेसेनेपुढे असेल. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळवावा लागेल. त्यासाठी यापुढच्या काळात लोकांचे प्रत्र घेऊन सतत रस्त्यावर उतरावे लागेल. शिवसेनेची खरी ओळख तीच आहे. हा पक्ष रस्त्यावर उतरून लोकांसाठी लढणारा आहे. अलीकडे या पक्षाला सतेची ऊब लागली आहे. त्यामुळे हा पक्ष स्वतःचे बळ हरवून बसला आहे. कधी भाजपच्या वळचणीला गेला तर कधी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली. यामुळे शिवसेनेच्या स्वाभिमानाचा 'भगवा' रंग उतरु लागला आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला गतवैभय मिळवून द्यायचे असेल तर केवळ स्वबळाचे नारे देऊन चालणार नाही तर सोलापूर शहरातील महत्वाचे आणि विव्हाळ्याचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. येणाऱ्या काळात या पक्षाचे स्थानिक नेतृत्व कशाप्रकारे राजकारण कोल यावरच ठाकरेसेनेचे अस्तित्व आणि यश अवलंबून असेल.