अन्नातून विषबाधा? मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

पायधुनी, मुंबई : शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि १३ व १६ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), नसरीन डोकाडिया (वय ३५) आणि त्यांच्या मुली आयशा (वय १६) व झैनब (वय १३) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने नातेवाईकांसोबत रात्री जेवण केले होते. जेवणानंतर त्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौघांनाही उलट्या, जुलाब, चक्कर आणि पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली. तब्येत बिघडताच त्यांनी प्रथम कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर त्यांना तातडीने जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान प्रथम एका मुलीचा, नंतर दुसऱ्या मुलीचा आणि त्यानंतर पालकांचा मृत्यू झाला.

 तपासाची दिशा

  • अन्नातून विषबाधेची प्राथमिक शक्यता
  • आतड्यातील अन्नाचे नमुने तपासासाठी पाठवले
  • शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार