सुभाष चंद्र बोस- "तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा!"
.jpeg)
जय हिंद..! या घोषणेचे उद्गाते नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. सुभाष चंद्र बोस नाव उच्चारले की, देशाविषयी प्रेम, आदराच्या भावना व तळमळीने ऊर भरून येते. सुभाषबाबुंचे प्राथमिक शिक्षण ख्रिस्ती मिशनऱ्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळेत झाले, मात्र तेथील भेदभावाच्या वर्तणुकीमुळे शाळा सोडली व दुसऱ्या शाळेतून मॅट्रिक शिक्षण पूर्ण केले. ज्ञानाच्या मंदिरातच ख्रिश्चन व ख्रिश्चनेतर विद्यार्थ्यांचा असा भेदभावबघून सुभाष बांबूच्या मनावर देश्याविषयी प्रेम जागृत झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना सुद्धा तीच परिस्थिती त्यामुळे संप,हरताळ यासारखे शस्त्र त्यांनी वापरले. जातीभेद,वर्णभेद या गोष्टींचा सारासार विचार करून विद्यार्थी संघटनेचा वाढता रोष लक्षात घेऊन शेवटी कोलकाता विद्यापीठाने सर्वांसाठी "शिक्षणाचे द्वार" खुले असावे या धोरणाने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी समान अधिकार दिला. स्कॉटीश चर्च कॉलेजमधून 1919 साली बी.ए चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या मनावर अध्यात्मचा प्रभाव झाला. आय सी एस होण्यासाठी वडिलांनी त्यांना इंग्लंडला पाठवले. आय सी एस परीक्षा उत्तीर्ण झाले मात्र सरकारी नोकरी करायची नाही, कारण "इंग्रजांच्या जुलमी धोरणांशी निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे भारताची सेवा करणे मुळीच शक्य नाही. इंग्रजी धोरणे जुलमी राजवट जवळून बघितली होती व यातना स्वतः भोगल्या होत्या. म्हणून आय सी एस पदवी परत केली व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.भारतामध्ये महात्मा गांधींचा विचाराने विचाराचे वारे वाहत होते. त्यांच्या समवेत सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले.अखंड भारतातील वेगवेगळ्या प्रांतांचा विचार केल्यास तेथील स्थानिक नेते, क्रांतिकारक, आंदोलक सर्वोत्तरी प्रयत्न करत होते.बंगाल प्रांतांचे नेतृत्व देशबंधू चित्तरंजनदास यांच्याकडे होते व सुभाष बाबुंनी त्यांना राजकीय गुरू मानून कार्याचा प्रारंभ केला.चित्तरंजन दास यांच्या मृत्यूनंतर बंगालचे नेतृत्व सुभाषबाबुंकडे आले.
देशभक्तीची ओढ त्याचबरोबर अंगी स्वयंशिस्तअसल्यामुळे व्यायाम,कवायत याचे प्रशिक्षण देऊन तरुणांनाना संघटित करून "स्वयंसेवक दल" तयार केले. या स्वयंसेवक दलाच्या माध्यमातून युवकांच्या मनात राष्ट्रभक्ती, देशप्रेम जागृत करून 1921 सालच्या बेझवाडा येथील काँग्रेसचे अधिवेशनात असहकार आंदोलनाचे संचालन कसे करून याचे याचे उत्तम प्रदर्शन केले. मात्र इंग्रज सरकारने त्याला बेकायदेशीर ठरवले. 1921 ला त्यांना पकडून तुरुंगात टाकले. हा त्यांचा जीवनातील पहिला तुरुंगवास...! यातून खऱ्या राष्ट्रभक्तांची ओळख झाली व त्यातून तीव्र देशभक्तीची ओढ निर्माण झाली. 1922 साली काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काही नेत्यांसोबत विचार पटत नसल्यामुळे मतभेद झाले व त्यांनी" स्वराज्य दल" स्थापन केले. स्वराज्य दलामार्फत फॉरवर्ड ब्लॉक हे पत्र चालू केले या पत्रातील लेखांमुळे लोकांमध्ये राष्ट्रभक्तीचे व नवचैतन्य निर्माण झाले.स्वराज्य दलाचे नामांतरण करून पुढे 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॅक पक्षाची स्थापना केली. मात्र इंग्रज सरकारने लेखातील प्रखर विचारांमुळे "देशद्रोही" ठरवून मंडालेच्या तुरुंगात पाठवले.गांधीजी सोबत 1930 च्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना पुन्हा अटक केली व परत तुरुंगवास भोगावा लागला. परंतु तेथे त्यांची प्रकृती खालावली त्याचबरोबर त्यांच्या लोकप्रियतेमुळे कोलकत्याच्या महापौर पदी त्यांची निवड झाली त्यामुळे सरकारने त्यांची काही नियम अटीनुसार तुरुंगातून मुक्तता केली." तुरुंगात मरण पत्करेल पण अटी लादून मुक्त होणार नाही" सुभाषबाबुंनी असे सडेतोड बोलले. तेव्हा सरकारला त्यांना तुरुंगातून मुक्त करावे लागले. सुखदेव भगतसिंग, राजगुरू यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे इंग्रज सरकारने देशद्रोहाचा खटला लादून त्यांना फाशीचे शिक्षा सुनावली, तेव्हा सुभाष बाबुंनी महात्मा गांधींनी सरकारसोबतचा करार मोडावा व त्यांची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी इच्छा व्यक्त केली परंतु, गांधींनी सरकारविरोधाची भूमिका मोडली नाही व शेवटी सुगदेव भगतसिंग व राजगुरू यांना फाशी देण्यात आलीच....!स्वतःच्याच देशहितासाठी व स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य हे देशद्रोहाचे कसे ठरू शकते? म्हणून दुखी झालेल्या सुभाष बाबुनी महान क्रांतिकारकांना वाचू शकले नाही, त्यामुळे गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
देशप्रेमापोटी ज्वलंत विचारसरणीचे सुभाषबाबू केवळ राष्ट्राचे अखंडत्व अबाधीत रहावे म्हणून राष्ट्रीयकाँग्रेस सोबत जुळवून घेत होते म्हणून परत 1938 मध्ये हरिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले परंतु,1939 मध्ये परत गांधीजींशी मतभेद झाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. रक्तात मुळात जहालवादी विचारसरणी त्यामुळे गांधींच्या मवाळवादी धोरणाशी त्याचे पटणे शक्य नव्हते.यावेळेस जगभर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे वारे पसरू लागले. इंग्लंडची पडती बाजू लक्षात घेता व्यापक दृष्टिकोनातून व आंतरराष्ट्रीय घडामोडीतून सुभाष बाबूंनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. कलकत्ता येथील "कालकोठारी स्मारक" हटवण्याच्या आंदोलनातून त्यांना अटक केल्यानंतर तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे घरातच 62 पोलिसांच्या नजरबंदीत ठेवण्यात आले,त्यामुळे त्यांचा जगाशी संबंध तुटला,त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेऊन एका मौलवीच्या वेषात झियाउद्दीन हे नाव धारण करून पसार झाले व ते अफगाणिस्तान पर्यंत जाऊन पोहोचले. तेथील विश्वसनीय सहकाऱ्यांनी बर्लिनला जाण्याची व्यवस्था केली. बर्निंग ला हिटलर सोबत भेट घेऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी परदेशातील भारतीयांची व युद्धबंदी सैनिकांची एक सेना तयार करण्याची योजना आखली. 4 जुलै 1943 ला सिंगापूरला भारतीय स्वातंत्र्य संमेलनाच्या अधिवेशनात "आझाद हिंद सेनेची" स्थापना केली. जय हिंद! तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा! या घोषणेने प्रेरित होऊन,सैनिकांनी ब्रिटन व संयुक्त राष्ट्र संघाच्या विरोधी युद्धाची घोषणा केली. या सेनेमध्ये महिला सुद्धा कार्यरत होत्या.लक्ष्मी एस स्वामीनाथन उर्फ कॅप्टन लक्ष्मी यांनी "झाशीच्या राणी" पथकाचे नेतृत्व सांभाळले. समस्त आझाद हिंद सेनेने "चलो दिल्ली" ची घोषणा देऊन पूर्ण ताकतिनीशी एकजूट होऊन, रंगून,कोहिमा जिंकले. अंदमान व निकोबार बेटे जिंकून त्यांचे "शहीद व स्वराज्य"हे नामकरण केले.एकीकडे जागतिक महायुद्धात जर्मनी व जपान हरू लागल्यामुळे त्यांची मदत बंद झाली. सुभाष बाबुंनीं सेनेचे मुख्यालय बँकॉकला हलवले. सुभाष बाबू मात्र खचले नाही त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून शिस्त व आधुनिक शस्त्र साठ्यासह "चलो दिल्ली" ची घोषणा करत जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध युद्धाची तयारी केली. मात्र दुर्दैव असे की,18 ऑगस्ट 1945 ला टोकियो ला जात असताना विमानाला आग लागून त्यांचे निधन झाले. या धैर्यशील,महान क्रांतिकारकाच्या कार्याला इतिहास साक्षी आहे. नेताजींच्या मृत्यूचे गूढ रहस्य मात्र अजूनही अनुत्तरीत आहे. त्यांच्या कार्याला सलाम व जय हिंद ! जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
श्री विनोद शेनफड जाधव