एसआयआरवरून भाजपच्या टीकेला काँग्रेसचे चेतन नरोटेंचे प्रत्युत्तर; ‘निवडणूक आयोगाची बाजू का मांडत आहात?’

सोलापूर : एसआयआर प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतल्याने भाजपने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर सडकून टीका केली होती. या टीकेला आता काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे,. तुम्ही निवडणूक आयोगाची बाजू का मांडत आहात? असा सवाल चेतन नरोटे यांनी केला, तसेच महापौर विनायक कोंड्याल, नरेंद्र काळे आणि रंजीता चाकोते यांच्यावर देखील नरोटे यांनी टीका केली या पत्रकार परिषदेस नगरसेवक नरसिंह आसादे, माजी महापौर आरिफ शेख,संजय हेमगड्डी, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे यांची उपस्थिती होती