शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, १२ सवलती लागू
मुंबई : कमी पाऊस आणि दीर्घ कोरड्या कालावधीमुळे निर्माण
झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३५८ पैकी
२६५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. हा निर्णय राज्याच्या दुष्काळ
व्यवस्थापन यंत्रणेतील Trigger-1 अंतर्गत घेण्यात आला आहे. या
तालुक्यांमध्ये तातडीने पीक पंचनामे आणि पीकस्थितीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे
राज्यातील सुमारे ७४ टक्के तालुके दुष्काळाच्या उपाययोजनांच्या कक्षेत आले आहेत.
सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आणि पिकांवर परिणाम
झाल्याचे अहवाल आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्याचे निर्देश
दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये
जिल्हाधिकाऱ्यांनी पीक पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची वास्तविक स्थिती दर्शवणारी छायाचित्रे
आणि GPS कोऑर्डिनेट्स संकलित
करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात
आले आहे.
शेतकऱ्यांसाठी १२ प्रकारच्या सवलती
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी राज्य सरकारने विशेष बाब
म्हणून विविध उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
1.
जमीन महसुलात सूट
2.
पीक कर्जाचे पुनर्गठन
3.
शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
4.
कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट
5.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा
शुल्कात माफी
6.
रोहयोअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत
जास्त कामे सुरू करणे
7.
आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा
8.
टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज
जोडणी खंडित न करणे
9.
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांसाठी अन्नधान्याची
उपलब्धता सुनिश्चित करणे
10. जनावरांसाठी
आवश्यक चारा उपलब्ध करून देणे
11.
जलसंधारणाची कामे सुरू करणे
12.
शासनाच्या पूर्वीच्या निर्देशांनुसार पिण्याचे आणि
जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे
पीक नुकसान भरपाई स्वतंत्र निर्णयाने
दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या २६५ तालुक्यांतील
शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन
निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्याच्या
मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार नैसर्गिक आपत्तीतील पीक नुकसानीसाठी
पंचनामे, पडताळणी, e-KYC आणि DBT
अशा प्रक्रियेद्वारे मदत वितरित केली जाते.
सोलापूर जिल्ह्यातील कोणते तालुके?
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,
मोहोळ, माढा, करमाळा,
पंढरपूर, सांगोला, माळशिरस
आणि मंगळवेढा या तालुक्यांचा दिलेल्या यादीत समावेश आहे.
२६५ तालुक्यांची यादी
कोकण विभाग: श्रीवर्धन, रत्नागिरी, संगमेश्वर,
राजापूर, सावंतवाडी, दोडामार्ग,
कणकवली, कुडाळ, वैभववाडी,
मालवण, देवगड, वेंगुर्ला.
नाशिक व खानदेश: मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव,
सुरगणा, इगतपुरी, पेठ,
सिन्नर, येवला, देवळा,
धुळे, साक्री, सिंदखेडा,
शिरपूर, एरंडोल, पारोळा,
धरणगाव, चोपडा, पाचोरा,
जामनेर, जळगाव, भडगाव,
अमळनेर, रावेर, चाळीसगाव,
भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर,
यावल, अक्कलकुवा, शहादा,
नंदुरबार, नवापूर, तळोदा,
अक्राणी.
अहिल्यानगर व पुणे: नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत,
जामखेड, शेवगाव, पाथर्डी,
नेवासा, राहुरी, संगमनेर,
अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर,
राहाता, भोर, वेल्हा,
खेड, शिरूर, बारामती,
इंदापूर, दौंड, पुरंदर.
सोलापूर: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी,
अक्कलकोट, मोहोळ, माढा,
करमाळा, पंढरपूर, सांगोला,
माळशिरस, मंगळवेढा.
सांगली, सातारा व कोल्हापूर: मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ,
सातारा, खटाव, माण,
फलटण, खंडाळा, महाबळेश्वर,
पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा,
भुदरगड, आजरा, चंदगड.
छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड: छत्रपती
संभाजीनगर, कन्नड, सोयगाव,
पैठण, वैजापूर, गंगापूर,
खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री,
बदनापूर, घनसावंगी, अंबड,
जालना, परतूर, मंठा,
भोकरदन, जाफ्राबाद, बीड,
गेवराई, माजलगाव, केज,
अंबाजोगाई, परळी, आष्टी,
पाटोदा, शिरूर कासार, धारूर,
वडवणी.
लातूर, धाराशिव व नांदेड: लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर,
शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट,
धाराशिव, कळंब, भूम,
वाशी, तुळजापूर, लोहारा,
परंडा, उमरगा, नांदेड,
बिलोली, कंधार, लोहा,
हदगाव, भोकर, देगलूर,
किनवट, हिमायतनगर, माहूर,
धर्माबाद, उमरी, अर्धापूर,
नायगाव, पूर्णा, पालम.
परभणी, हिंगोली, बुलढाणा व
अमरावती: परभणी, सोनपेठ, जिंतूर,
गंगाखेड, सेलू, मानवत,
पाथरी, हिंगोली, औंढा
नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत, जळगाव जामोद, संग्रामपूर,
चिखली, देऊळगावराजा, मेहकर,
बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार,
खामगाव, शेगाव, मलकापूर,
मोताळा, नांदुरा, अमरावती,
भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा,
धारणी, चिखलदरा, वरूड,
मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर.
अकोला, वाशिम व यवतमाळ: अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा,
मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी,
वाशिम, रिसोड, मालेगाव,
मंगरूळपीर, कारंजा, मानोरा,
यवतमाळ, बाभूळगाव, कळंब,
दारव्हा, दिग्रस, आर्णी,
नेर, पुसद, उमरखेड,
महागाव, वणी, मारेगाव,
झरी जामणी, केळापूर, घाटंजी,
राळेगाव.
वर्धा, नागपूर, भंडारा,
चंद्रपूर व गडचिरोली: वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी,
नागपूर, कामठी, सावनेर,
पारशिवनी, मौदा, भिवापूर,
कळमेश्वर, काटोल, रामटेक,
हिंगणा, उमरेड, कुही,
नरखेड, नागपूर शहर, भंडारा,
पवनी, लाखांदूर, तिरोडा,
चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी,
राजुरा, कोरपना, मूल,
वरोरा, सावली, चिमूर,
नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा,
गडचिरोली, चामोर्शी.