महिला आरक्षणासाठी सोलापूरात धरणे आंदोलन; तात्काळ अंमलबजावणीची मागणी
सोलापूर : देशभरातील महिला संघटनांनी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 33 टक्के महिला आरक्षण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये जोरदार आंदोलन छेडले. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीने जिल्हा परिषद, पुनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राज्याध्यक्षा नसीमा शेख आणि जिल्हा अध्यक्षा शकुंतला पाणीभाते यांनी केले. यावेळी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 ची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. नेत्यांनी सांगितले की, महिला आरक्षणाची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) यांच्याशी जोडल्यामुळे महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाला अनावश्यक विलंब होत आहे. “नारी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे हक्क पुढे ढकलले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
महिला संघटनांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या:
अंमलबजावणी जनगणना व परिसीमनाशी जोडणाऱ्या
अटी रद्द कराव्यात
लोकसभा व विधानसभांमध्ये 33% आरक्षणाची कालबद्ध अंमलबजावणी करावी
पारदर्शक आराखडा जाहीर करावा
महिला संघटनांशी सल्लामसलत करावी
यानंतर जिल्हा सचिव कॉ. शेवंता देशमुख यांच्या
नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
या आंदोलनात विविध महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने
सहभागी झाल्या. देशभरातील लोकशाही शक्तींनी एकत्र येऊन महिला आरक्षणाच्या
अंमलबजावणीसाठी संघर्ष उभारण्याचे आवाहनही करण्यात आले.