संगमेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांचे मियावाकी जंगल भ्रमंती
.jpeg)
सोलापूर : संगमेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांचे
मियावाकी जंगल भ्रमंतीचे मंगळवार रोजी आयोजन करण्यात आले. श्री सिद्धेश्वर वनविहार,
सोलापूर येथील मियावाकी जंगल पद्धत ही एक विशिष्ट तंत्रज्ञानावर आधारित वृक्षारोपण
पद्धत आहे, जी जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकीरा मियावाकी यांनी विकसित केली. या पद्धतीत
निसर्गाच्या नैसर्गिक जंगलाच्या संकल्पनेनुसार, विविध प्रकारच्या स्थानिक (स्थानिक
जैवविविधता जपणाऱ्या) वनस्पती लावल्या जातात. या जंगलांची वाढ सामान्य वृक्षारोपणाच्या
तुलनेत 10 पट जास्त वेगाने होते आणि 30 पट अधिक घनदाट असते. सिद्धेश्वर वन विहार येथील ०.२० हेक्टर एवढे क्षेत्र मियावाकी जंगलने व्यापले आहे. २०२१ मध्ये तयार करण्यात
आलेल्या स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या जंगलामुळे पक्षी, कीटक आणि अन्य वन्यजीवांसाठी योग्य अधिवास
निर्माण झाला आहे. या पद्धतीत वृक्ष जलद गतीने वाढतात आणि 2-3 वर्षांतच घनदाट जंगल
तयार झाले. या मियावाकी जंगलामुळे शहरातील
कार्बन डायऑक्साइड शोषून हवा स्वच्छ ठेवण्यास मदत होते. तसेच शहरी भागात अत्यंत कमी जागेत ही पद्धत वापरून घनदाट जंगल निर्माण
करण्यात आले. या उपक्रमात विभागातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर,
डॉ. शिवाजी मस्के यांचे मार्गदर्शन लाभले. तर हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. मंजु
संगेपाग, प्रा. शिरीष जाधव, श्री. धनंजय बच्छाव यांनी परिश्रम घेतले