कोकणात महायुतीत रंगली सत्ता स्पर्धा

राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणाला झुकते माप मिळाल्यामुळे इथला सामान्य माणूस खूश झाला असला तरी यातून या प्रदेशावर कब्जा मिळवण्याचे भाजपचे डावपेच स्पष्ट होत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असले तरी एकालाही मंत्रिपद मिळालेले नाही. त्याऐवजी अखेर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने उमेदवार दिला नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अखंडित शिवसेनेचे पाचपैकी चार आमदार होते. पण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपात रत्नागिरीचे मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटाची वाट धरली. ठाकरे गटाचे माजीमंत्री भास्कर जाधव आणि राजन साळवी टिकून राहिले. या विधानसभा निवडणुकीत साळवींचा पराभव झाला. त्यामुळे आता जाधव एकाकी पडले आहेत. जिल्ह्यातील पाचवे आमदार अजितदादा पवार गटाचे शेखर निकम यांनी कडवी झुंज देत आपला गड शाबूत राखला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संकटमोचकाची भूमिका निभावणारे सामंत यांनी याही वेळी उद्योग खातं आपल्याकडे राखलं आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव कायम राहणार आहे.

जोडीला त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनीही राजापूर मतदारसंघातून विजय मिळवत राजकीय कारकिर्द सुरू केली आहे. अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधु, तर रत्नागिरी जिल्ह्यात सामंत बंधूंचे प्रभावक्षेत्र वाढले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सामंतांना मागील अडीच वर्षांप्रमाणे मैदान मोकळं राहिलेलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर सवेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणाला झुकतं माप मिळाल्यामुळे कोकणातील जनता खुश दिसत आहे. त्यातच आता येत्या काळात कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपचे डावपेच स्पष्ट होत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असले तरी एकालाही मंत्रिपद मिळालेले नाही. त्याऐवजी अखेर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अखंडित शिवसेनेचे पाचपैकी चार आमदार होते. पण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपात रत्नागिरीचे मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटाची वाट धरली.

माजी मंत्री जाधव आणि साळवी टिकून राहिले. या विधानसभा निवडणुकीत साळवींचा पराभव झाला. त्यामुळे आता जाधव एकाकी पडले आहेत. जिल्ह्यातील पाचवे आमदार अजितदादा पवार गटाचे शेखर निकम यांनी कडवी झुंज देत आपला गड शाबूत राखला आहे. वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपचे डावपेच दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधू, तर रत्नागिरी जिल्ह्यात सामंत बंधूंचे प्रभावक्षेत्र वाढले आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सामंतांना मागील अडीच वर्षांप्रमाणे मैदान मोकळं राहिलेलं नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. या मंत्रिपदाच्या बळावर कदम पिता-पुत्र जिल्ह्याच्या उत्तर भागात पकड मजबूत करू शकतात. त्याचबरोबर, खासदार राणे आणि मंत्री नितेश हेसुद्धा यापुढील काळात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त लक्ष घालणार, हे उघड आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांचे थोरले चिरंजीव नीलेश राणे यांनी कुडाळमधून विधानसभेत प्रवेश केला आहे. शिवाय, विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले याकटे चिरंजीव नितेश यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देऊन कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि संवेदनशील असं मत्स्य व बंदरे हे खातं सोपवलं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजीमंत्री दीपक केसरकर यांना मात्र मंत्रिपदाची संधी नाकारली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात गमावलेली राजकीय ताकद या विधानसभा निवडणुकीनंतर राणे कुटुंबाने पुन्हा मिळवली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या रूपाने ठाकरे गटाचा एकमेव बुरुज शिल्लक होता. या निवडणुकीत तोही ढासळला आहे, त्यांच्यामागे गेल्या वर्षापासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ससेमिराही लावलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासह ठाकरेंचे इतर निष्ठावान सैनिक कितपत टिकाव धरतील, याबाबत शंका आहे. यापुढील काळात कोकणामध्ये महायुतीतील तीन घटक पक्षांमध्येच सत्ता स्पर्धा रंगणार आहे. त्यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व रायगडात वजनदार नेते सुनील तटकरे व रत्नागिरी जिल्ह्यात आमदार निकम यांच्यामुळे आहे. राणेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बलवान झालेल्या भाजपची रत्नागिरी जिल्ह्यात फारशी ताकद नसली तरी शिवसेनेच्या सामंत आणि कदम या दोन सत्ता केंद्रांमधील सुप्त स्पर्धेचा लाभ उठवत ते ती वाढवू शकतात. येत्या काळात ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे दिसत आहे. त्यात यश आले तर जिल्ह्यात ठाकरे गट आणखी दुबळा होणार आहे.