पाय जमिनीवर, नजर विकासावर !

मराठी पत्रकार दिन काल साजरा झाला, त्यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांनीही आदर्श पत्रकारांच्या पाठीचा कौतुकाची थाप दिली. लोकशाहीतले तीन स्तंभ सांभाळणारी प्रमुख मंडळी या दोन्ही समारंभाला उपस्थित होती. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अर्थातय पत्रकार. आमदार देवेंद्र कोठे यांनी दोन्ही ठिकाणी छोटेखानी भाषण केले. त्या भाषणाला राजकीय रंग नव्हता. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी आपली मते मांडली. सोलापूर शहराच्या विकासाची दिशा दाखवणारे ते भाषण होते. आमदार असूनही सत्तेचा दर्प त्यांच्या भाषणात नव्हता. सोलापूरची विमानसेवा आणि सोलापूरचा पाणीपुरवठा या दोन विषयावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे जाणवले विमानसेवा सुरु झाली तर विशिष्ट वर्गाला फायदा होईल, पण शहराला मुबलक पाणी मिळाले तर सामान्य जनता आनंदी होईल हा सामाजिक दृष्टिकोन आमदार कोठे यांच्या भाषणात दिसला. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त या प्रशासनातील दोन उच्ब पदस्थ अधिकाऱ्यांनी कोठे यांच्या या कार्यफदतीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. देवेंद्र कोठे है. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही हा मतदारसंघ भाजपकडे नव्हता. काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांचा हा पूर्वीचा मतदारसंघ, सलग तीनवेळा त्या याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. मुस्लीमबहुल मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून येणे ही गोष्ट सोपी नव्हती. परंतु 'त्या' देवेंद्रांनी विश्वास दाखवला आणि 'या' देवेंद्रांनी तो सार्थ ठरवला. अशक्य वाटणारा विजय कोठे यांनी शक्य करून दाखवला. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांचा समावेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये झाला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांची कार्यपद्धती इतर राजकारणी लोकांपेक्षा वेगळी आहे. टेंडर, कमिशन, टक्केवारी यापासून ते कोसो दूर आहेत. दहा वर्षे ते महापालिकेत होते. कामासाठी कुणाला पैसे दिल्याचे आणि कुणाकडून घेतल्याचे ऐकीवात

नाही. काम न करता नावाचे फलक लावण्याचा दिखाऊपणा त्यांनी कधी केला नाही. लोकांच्या गरजा पाहून कामे केली. कंत्राटदारांना खूश करण्यासाठी नियी वापरला नाही. प्रभागात अनेक ठिकाणी चांगल्या गुणवनेचे रस्ते केले. याबाबतीत कुठेही तडजोड केली नाही. सामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला, गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम राबवतानाच त्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. तुटपुंजा निधी असूनही विकासाचे अनेक प्रश्न सोडविले. आमदार सोलापूर प्रशांत जोशी झाल्यामुळे आता कामाचा परीघ वाढला आहे. लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. गेल्या दहा वर्षात भाजपला जे जमले नाही ते येत्या पाच वर्षांत करुन दाखवण्याची 'देवेंद्र' या नावात आहे. धमक मुलगा कर्तबगार असेल तर बाप से बेटा सवाई महणतात. राजकारणात थोडा बदल काकापेक्षा पुतण्या वरचढ असे चित्र आपल्याला पाहायला मिळते. राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना जय महाराष्ट्र करुन नवा पक्ष काढला, मनसेचे पहिल्या झटक्यात तेरा आमदार निवडून आले. अजित पवार यांनी शरद पवारांचे बोट सोडून नवी वाट धरली. पहिल्याच निवडणुकीत चांगले यश मिळवले, धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा पक्ष सोडला आणि सत्तेची शिड़ी चढली. सोलापुरातही कोठे यांनी ही परंपरा पुढे नेली. काका महेश कोठे यांचे बोट धरून देवेंद्र राजकारणात आले. महेश यांनी शिवसेनेचे तिकीट देऊन नगरसेवक केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुतण्याने वेगळी वाट चोखाळली. स्थानिक आमदारांचा मोठा विरोध असतानाही भाजपात जाण्याची हिंमत दाखवली. अवच्या चार महिन्यात नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. ज्यामुळे विधानसभेचे तिकीट पदरात पडलेच पण विजयाची माळदेखील गळ्यात पडली. आमदारकीसाठी काकांनी पक्षांतराची मालिका चालवली तरी यशाने हुलकावणी दिली. पुतण्या देवेंद्रने मात्र पहिल्याच प्रयत्नात विधानसभा गाठली.

क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू पदार्पणातय शतक ठोकतो तसे आमदार देवेंद्र कोठे यांचे झाले. वयाने लहान असले तरी त्यांचे पाय जमिनीवर आणि नजर विकासकामांवर आहे. चांगल्या कामासाठी वयाचे बंधन नसते. त्यासाठी इच्छाशक्ती लागते. अनेकवेळा निवडून येऊनही काही आमदारांची झोळी विकासकामाबाबत रिकामीच आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवध्या सोळाव्या क्यों ज्ञानेश्वरी लिहिली. बाळशाखी जांभेकरांनी विसाव्या वर्षी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. क्रिकेटमधल्या अनेक खेळाडूंनी कमी वयात विक्रमाला गवसणी घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांची कर्तबगारी तरुणाईतच फुलली आहे. आमदार देवेंद्र कोठे हेदेखील वयाने लहान आहेत. ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आहेत. कदाचित त्यांना कामाचा अनुभव कमी असेलही, परंतु त्यांची शहराच्या विकासाकडे बघण्याची दृष्टी, तो विकास प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची धडपड, त्याकरिता लागणारे प्रामाणिक प्रयत्न आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे 'कथनी आणि करनी यामध्ये अंतर न ठेवण्याची प्रामाणिक भावना जेव्हा त्यांच्या बोलण्यात दिसू लागते तेव्हा सोलापूरच्या क्षितिजावर विकासाची नवी पहाट उगवेल, असा विश्वास वाटतो.