निवडून आणले 'खरे' मात्र कोणता झेंडा घेणार हाती...
.jpeg)
संकेवळ माजी आमदार राजन पाटील यांना विरोध म्हणून आपले
पक्ष, गट-तट बाजूला सोडून यंदा अनगरकर विरोधातील आमदार निवडून आणायचाच या हेतूने
तुतारीचा आमदार निवडून आणण्यासाठी एकत्र आलेले महायुतीमधील नेते राष्ट्रवादीचे
प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, भाजपचे विजयराज डोंगरे तसेच
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष | व्हाया वंचित आघाडीचे रमेश
बारसकर यांची मोहोळ | तालुक्यात आमदार निवडून आणूनही मात्र
राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्याने मोठी गोची झाली आहे. त्यामुळे ते आता
निवडून आणले 'खरे' मात्र कोणता झेंडा
घेणार हाती याकडे लक्ष लागले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात तब्बल गेल्या ४० वर्षांनंतर
परिवर्तन करण्यासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या जुन्या गोठातीलच आणि
महायुतीमधील घटक पक्षाचे मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेते राष्ट्रवादीचे मुख्य
प्रवक्ते उमेश पाटील, भाजपचे माजी सभापती विजयराज डोंगरे,
माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, माजी उपसभापती मानाजी माने यांनी
आपले पक्ष, गट-तट विसरून तालुक्यातील इतर प्रमुख नेत्यांच्या
सहकार्याने शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातामध्ये घेत राजू खरे यांना मोठ्या
मताच्या फरकाने निवडून आणले खरे. परंतु, महायुती सत्तेत
आल्याने या नेत्यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. भविष्यात ते कोणती भूमिका
घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते पद असतानाही उमेश पाटील
यांनी अनगरकरांचा पराभव करण्याचा विडा उचलला. वडील मनोहरभाऊ डोंगरे यांच्या साथीने
अनगरकरांनी सर्व सत्तास्थाने उपभोगली असल्याचा आरोप करीत डोंगरे यांनीही भाजपपासून
फारकत घेत राजू खरे यांना निवडून आणण्यामध्ये मोठा वाटा उचलला. मूळ शरदचंद्र पवार
पक्षामध्ये असलेले रमेश बारसकर यांनीही
राजू
मोहोळ
बालाजी शेळके
खरे यांच्या बाजूने मोहोळ शहरातून मोठी ताकद लावली होती. तर महायुतीमधीलच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनीही खरे यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. यासह माजी उपसभापती मानाजी माने यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. शिवसेना उबाठा गटाचे दीपक गायकवाड, महेश देशमुख, विक्रम देशमुख, बाळासाहेब गायकवाड यांसह संजय क्षीरसागर यांच्यासह तालुक्यातील अन्य नेत्यांच्या प्रयत्नाने अनगरकरांचा बालेकिल्ला ढासळला. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार आल्यामुळे यापुढे काय राजकीय निर्णय घेणार?, आणि कोणत्या पक्षात काम करायचे ही गोची निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत माजी आमदार यशवंत माने यांनी तब्बल साडेतीन हजार कोटींचा विकास निधी आणूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आमदार राजू खरे यांच्या माध्यमातून आलेले यश टिकवण्यासाठी या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सत्तेमधील पक्षांमध्ये राहण्याकडे त्यांचा कल असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याच पक्षाविरुद्ध केलेली विधाने, तसेच वरिष्ठ नेत्यांनीही खालच्या स्तरावर मोहोळ मतदारसंघातील जनतेसमोर केलेली टीका पचवून पुन्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी उमेश पाटील हे कोणती नीती वापरतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये सलग पाच वर्ष
अर्थ व बांधकाम समितीचे सभापती पद मिळवून तालुक्यामध्ये विकासकामे केलेल्या
विजयराज डोंगरे यांनाही पुन्हा भाजपमध्येच काम करण्यासाठी प्रयत्नशील राहावे
लागणार आहे. इकडे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर हे कायमच विरोधी पक्षात व
संघर्षामध्ये काम केल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी
जुळवून घेतील अशी शक्यता असली तरी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हे
नेते महायुतीशीच संलग्न राहतील, हे मात्र नक्की..