अक्कलकोट नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
.jpeg)
दि. ८ तीर्थक्षेत्र
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात
वर्दळ वाढत असल्याने सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, पाणी, विज या सेवेवर ताण पडत आहे. मात्र सार्वजनिक स्वच्छतेकडे पालिकेचे अक्षम्य
दुर्लक्ष होत असल्याचे चित्र उभे झाले आहे.सुभाष गल्ली, जुना
अडत बाजार, लक्ष्मी मंडई, शास्त्री
गल्ली येथे रस्त्यावर कचरा वाढला आहे तो वेळेवर उचलला जात नाही, यामुळे नागरिकातुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . यामुळे स्वच्छ
सुंदर अक्कलकोट तीर्थक्षेत्र संकल्पना कागदावरच राहिले आहे .अक्कलकोट
तीर्थक्षेत्री भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामुळे बसस्थानक,
समाधी मंदिर, बुधवार पेठ वटवृक्ष स्वामी मंदिर
परिसर, गुरु मंदिर, भारत गल्ली भागात
स्वच्छता वारंवार बाधीत होते . वेळोवेळी साफसफाई झाली नसल्याने परिसरातील
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शास्त्री गल्ली, सुभाष
गल्ली, लक्ष्मी भाजी मंडई, नपा शाळा
सेंट्रल स्कुल मागे कचरा उचलला जात नाही तो रस्त्यावर येत आहे. लक्ष्मी भाजी मंडई
व एवन चौकजवळील प्रसाधनगृह येथील प्रसाधन गृह स्वच्छता नाही यामुळे नागरीकातुन
संताप व्यक्त होत आहे.
दक्षिण तालुक्यात पाणंद रस्त्यांचा प्रश्न बिकटच लोकप्रतिनिधी
व प्रशासनाचे दुर्लक्ष;शेतकऱ्यांमधून संताप संचार वृत्तसेवाकुंभारी,दि.8-दक्षिण सोलापूर
तालुक्यातील अनेक शेत शिवारात जाण्याकरता पाणंद रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना त्रास
सहन करावा लागत असून लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी
याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप
व्यक्त होत आहे. दक्षिण तालुक्यात मागील वर्षी
मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले
होते.परंतु ,त्यातील एकाही पाणंद रस्त्यास वर्षभराच्या
कालावधीत सुरुवात करण्यात आली नाही. प्रशासकीय अधिकाऱ्याचा निरुत्साह तथा
लोकप्रतिनिधीचा कमी पडलेला पाठपुरावा यासाठी कारणीभूत ठरत आहे. पाणंद रस्ते नसल्याने शेत शिवारात जाण्याकरता शेतकरी व सामान्य नागरिकांना
मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणंद रस्त्यावरून अनेक गावात तंटे सुद्धा निर्माण
होत आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या या रस्ते कामाच्या अनेक
फायली तहसील कार्यालयात मागील दोन वर्षांपासून प्रलंबित पडल्या आहेत. तरीसुद्धा प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी पाणंद रस्त्याचा प्रश्न
मार्गी लावण्याकरता पुढाकार घेत नसल्याने त्यांच्या कार्यपद्धती विरुद्ध रोष
व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण तालुक्यातील यंदाच्या खरीप हंगामामध्ये तीन ते चार
वेळा अतिवृष्टी झाली. आधीच शेतात जाण्यास पाणंद रस्ते नाहीत. त्यातच सतत पडलेल्या
पावसामुळे आपल्या शेतात जाण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
दुसऱ्याच्या शेतातून शेतकरी, शेतमजूर ,बैलगाडी
जाण्याच्या वादातून अनेक गावांत शेजारील शेतकऱ्यां- शेतकऱ्यांमध्ये मोठा
वाद निर्माण होत आहे. त्यामुळे
तालुक्यातील या रस्त्यांचा प्रश्न लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
अग्रक्रमाने सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
पीक घरी कसे आणायचे शंकर नगर तांडा ते कंदलगाव रोड पाणंद रस्त्यावर
रस्त्यावर मुरमीकरण न केल्याने या परिसरातील 40 ते 50 शेतकऱ्यांना शेताकडे
जाणे सुद्धा अवघड झाले आहे. शेतातील पीक घरी कसे आणायचे हा मोठा
प्रश्न सतावत आहे.विजयकुमार बिराजदार. शेतकरी विंचूर अक्कलकोट तालुक्यात सलून सेवेचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले.
तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८ : सततच्या
भाववाढीमुळे सलून कारागिरांना दर आणि दैनंदिन खर्चाचा
ताळमेळ बसत नसल्याने अक्कलकोट शहर व तालुका ग्रामीण भागात सलून सेवेचे दर २० ते ३०
टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळच्यावतीने देण्यात
आली.अक्कलकोट येथे श्री संतसेना महाराज मंदिरात सलून व्यवसायिक बांधवांची बैठक
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन विभूते यांच्या
मार्गदर्शनाखाली पार पडली. सलून साहित्याचे वाढलेले दर, दुकान
भाडे, वीजबिल, सलून मालक कारागीर
यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आदिंचा ताळमेळ बसत नसल्यामुळे नाभिक समाज त्रस्त
होता. त्यामुळे अक्कलकोट शहर व तालुक्यातील समाज बांधवांची बैठक घेऊन प्रत्येक
सेवांच्या दरात २० ते ३० टक्केनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सर्वच घटकामध्ये
दरवाढ झाल्यानें कमी दरात ग्राहकांना सेवा पुरवणे
व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या परवडत नव्हते.
महागाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळ सलून दरामध्ये वाढ करण्याचा
निर्णय घेतला आहे.अक्कलकोट शहर व तालुक्यात ग्रामीण भागात लागु असणार आहे.यावेळी
जिल्हा कार्याध्यक्ष भागवत विभूते,तालुकाध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, कर्मचारी महासंघाचे
तालुकाध्यक्ष सुभाष सुरवसे, युवक अध्यक्ष श्रीशैल सुरवसे,
शहराध्यक्ष लक्ष्मण विभूते, शहर युवक अध्यक्ष
व्यंकट विभूते, उपाध्यक्ष राजेश कोरे, सचिव महेश सुरवसे, पद्माकर
डिग्गे, प्रभाकर सुरवसे, सोमनिंग
सुरवसे,बाळकृष्ण कोरे, गंगाराम शाबादे,भाग्यश्री काळे, निंगप्पा कोरे, गोपी सुरवसे, दत्ता वाघमारे,पुंडलीक कोरे, मल्लिनाथ विभूते,प्रभाकर कोरे,अमर सुरवसे, काशिनाथ
विभूते, सोनल सुरवसे, सुमीत डिग्गे उपस्थित होते. ए. जी.पाटील पॉलिटेक्निकमध्ये"वाचन संकल्प
महाराष्ट्राचा" उपक्रम शहर संचार सोलापूर,दि.8-येथील ए.जी. पाटील पॉलिटेक्निक
इन्स्टिट्यूट येथे'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा अभिनव उपक्रम 1 ते 15 जानेवारी या कालावधीत
आयोजित करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए.चौगुले यांनी दिली. आजच्या या धकधकीच्या जीवनात मुलांमध्ये वाचनाची आवड कमी होत आहे.
वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन व संवाद कौशल्य विकसित
होण्यास मदत होते. अलीकडच्या काळात देशाचा तरुण वर्ग वाचन
संस्कृतीपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे
आकर्षित करण्यासाठी व वाचन संस्कृतीचा विकासाच्या
दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने
आयोजित या अभियांतर्गत 3
जानेवारीपासून महाविद्यालयातील ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
6 जानेवारी रोजी ग्रंथालयातील वाचनकक्षात विद्यार्थ्यांसाठी
सामूहिक वाचन घेण्यात आले. विद्यार्थ्यांना निरंतर वाचनाची सवय
लागावी यासाठी कोणती पुस्तके वाचावी,कशी वाचावीत याबाबत
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी "वाचन कौशल्य संवाद कार्यशाळा"
8 जानेवारी रोजी राबवण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. एन.
बी. पवार व प्रा. एल. एस. बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले . चांगला वाचक हा चांगला लेखक बनू शकतो. विद्यार्थ्यांमधल्या
लेखकास प्रोत्साहन देण्यासाठी वाचन कौशल्याची माहिती व मार्गदर्शनाच्या आधारे
पुस्तक परीक्षण या स्पर्धेचे 13 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या
स्पर्धेतील प्रथम तीन उत्कृष्ट परीक्षणास महाविद्यालयाच्यावतीने रोख रक्कम व
प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपात देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या
परीक्षणाचा समावेश महाविद्यालयाच्या वार्षिक अंकामध्ये करण्यात येणार असल्याचे
महाविदयालयातील ग्रंथपाल एम. एम. आडम यांनी सांगितले .या
उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष एस. ए. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य
एस. के. मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी
पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार ; 28 दिवसांचा फर्लो मंजूर मुबई-अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला 28 दिवसाची फर्लो म्हणजेच संचित रजा मुंबई
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली आहे. काल ही राजा मंजूर करण्यात
आली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे.
याआधी अरुण गवळी याला कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला
होता तो नामंजूर केल्याने अरुण गवळी याने नायायालयात धाव घेतली होती.त्यावरच
न्यायाधीशांनी काल निर्णय दिला आहे.गेल्या वर्षी अरुण गवळीने केला होता अर्ज कुख्यात
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28
दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. गेल्या वर्षी 18 ऑगस्ट 2024 रोजी अरुण गवळीने
नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता. मात्र
अरुण गवळीचा गुन्हेगारी जगतावरील प्रभाव पाहता आणि तो एकेकाळी गुन्हेगारी टोळीचा
मोहरक्या असल्याचे कारण देत विधानसभा निवडणुकांच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता लक्षात घेऊन कारागृह महानिरीक्षकांनी तो अर्ज
फेटाळला होता.गवळीच्या वकिलांचा युक्तीवाद आला कामी कारागृह
महानिरीक्षकांच्या त्याच निर्णयाच्या विरोधात अरुण गवळीने आपल्या वकिलांच्या
माध्यमातून नागपूर खंडपीठांमध्ये याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेसंदर्भात
नागपूर खंडपीठाने निर्णय घेत अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे.
या सुनावणीवेळी, गवळीचे वकील अॅड. मीर नगमान अली यांनी
कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा करत संचित रजा मिळावी अशी
मागणी केली, यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर गवळीने प्रत्येकवेळी
कायदे व नियमांचे काटेकोर पालन केलेले आहे. परिणामी, यावेळीही
रजा नाकारता येणार नाही, असे गवळीच्या वकिलांनी न्यायालयाला
सांगितले आहे.