२०२४ ने केले घराणेशाहीवर शिक्कामोर्तब
.jpeg)
तटकरे कुटुंब राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
हे लोकसभा निवडणुकीत उभे होते. ते रायगड मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर
विधानसभेला त्यांची मुलगी अदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आल्या.
विशेष म्हणजे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही मिळालं. म्हणजे एकाच घरात वडील आणि मुलगी
हे खासदार मंत्री झाले. दानवे कुटुंब माजीमंत्री रावसाहेब
दानवे हे लोकसभेला पराभूत झाले. मात्र, त्यांचा म लगा
संतोष दानवे हे भोकरदन विधानसभेतून तिसऱ्यांदा आमदार झाले. शिवाय त्यांची मुलगी
संजना जाधव या कन्नड विधानसभेतून आमदार झाल्या. म्हणजे भाऊ-बहीण हे दोघेही सध्या
आमदार आहेत. विशेष म्हणजे ते दोघे दोन पक्षात आहेत.
सामंत कुटुंब शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते
उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. शिवाय त्यांना मंत्रिपदही
मिळाले. त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत हेही राजापूर मतदारसंघातून निवडून आले. आता
दोघे सामंत बंधू विधानसभेत आहेत.
राणे कुटुंब कोकणातील नारायण राणे हे भाजपचे
खासदार असून केंद्रात माजी मंत्रीही आहेत. गेल्या विधानसभेला त्यांचे पुत्र नीलेश राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून तर दुसरे पुत्र नितेश राणे हे
कणकवली म तदारसंघातून आमदार झाले. म्हणजेच राणे कुटुंबात आता एक केंद्रीय मंत्री व
दोन आम दार पदे शिवाय एका आमदाराला कॅबिनेट मंत्रिपदही आहे. ठाकरे कुटुंब शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते
आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून आमदार झाले. त्यांचे सख्खे मावसभाऊ वरुण सरदेसाई
हेही वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार झाले. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत या
मावसभावांची जोडी दिसत आहे.
पवार कुटुंब बारामतीच्या पवार कुटुंबातही यावेळी चार पदे मिळाली. शरद
पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीतून खासदार झाल्या. त्यांच्या भावजयी या
सुनेत्रा पवार यांनाही राज्यसभेवर संधी मिळाली. त्यानंतर विधानसभेला अजित पवार
हेही बारामतीतून व रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून आमदार झाले. म्हणजेच पवार
कुटुंबात सध्या दोन खासदार व दोन आमदार आहेत. २०२४ साल संपायला फक्त दिवस शिल्लक आहेत. मात्र, या वर्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घराणेशाहीवर
शिक्कामोर्तब केलं. या वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक
झाल्या. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी अनेक जागांवर घराणेशाहीतील उमेदवार
उभे होते. त्यात अनेकांनी बाजीही मारली. महाराष्ट्रातील घराणेशाहीत कुणाचं नातं
काय आणि कोणत्या घराण्याने दवदवा राखलाय, तेच आपण
पाहूयात... प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून यंदा पुन्हा आमदार
झाले. त्यांचे सख्खे साडू सत्यजित देशमुख हे भाजपच्या तिकिटावर शिराळा
मतदारसंघातून निवडून आले. पाटील व देशमुख यांच्या पत्नी या म्हैसाळचे माजी आमदार
मोहनराव शिंदे यांच्या कन्या आहेत. म्हणजेच शिंदे घराण्याचे दोन्ही जावई आमदार
आहेत.
भुमरे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते संदीपान भुमरे हे सध्या खासदार आहेत. त्यांचे पुत्र विलास भुमरे हे पैठण मतदारसंघातून यावेळी पुन्हा आमदार झाले. म्हणजे भुमरे कुटुंबात पिता खासदार व पुत्र आमदार असे चित्र आहे. कर्डिले-जगताप- अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले हे यंदा राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांचे जावई संग्राम जगताप हेही अहिल्यानगर शहर मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार आहेत. म्हणजेच यंदाच्या विधानसभेत सासरा जावई हे दोघेही आमदार आहेत. यावेळी दोन आमदार आहेत. धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून निवडून आले. तर त्यांच्या बहीण पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या भाजपच्या आमदार आहेत. मुंडे कुटुंबातील भावा- बहिणीकडे सध्या सत्तेच्या चाव्या आहेत. चव्हाण कुटुंब भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण हे सध्या खासदार आहेत. त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर मतदारसंघातून यंदा आमदार झाल्या. म्हणजेच वडील खासदार व मुलगी आमदार अशी सत्तास्थाने सध्या चव्हाण कुटुंबात दिसून येत आहेत.
राजेभोसले कुटुंब साताऱ्याचे आमदार शिवेंद्र राजे भोसले हे यावेळी भाजपकडून आमदार झाले. त्यांचे सख्खे चुलत
बंधू उदयनराजे भोसले हे सध्या भाजपचे खासदार आहेत. या राजघराण्यात सध्या खासदारकी
व आमदारकी अशी दोन्ही पदे आहेत.
भुजबळ कुटुंब येवल्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अजित पवार गटाकडून पुन्हा आमदार झाले. त्यांचे चिरंजीव पंकज
भुजबळ हे विधान परिषदेवर आमदार आहेत. म्हणजेच पिता-पुत्र या दोघांकडेही सध्या
सत्तेची सूत्रे आहेत.