शेटफळ जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू अपघाता नंतर वाहन न थांबता निघून गेले

माढा :- सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ(ता. मोहोळ) येथील उड्डाणपुलावर दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आज (शुक्रवारी)सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बळीराम हरिभाऊ निळे (वय ३१)  रा. वडाचीवाडी, (ता.माढा) असे या अपघातातील मयताचे नांव आहे

 अपघातात मरण पावलेला तरुण मोडनिंब येथे पोळ्याच्या बाजारातील खरेदीसाठी आला होता. खरेदी झाल्यानंतर वडाचीवाडी या आपल्या गावाकडे तो परत निघालेला होता. शेटफळ येथील उड्डाणपुलावर या तरुणाच्या दुचाकीस (एम एच ४५ ए टी ०२६०) अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. आणि ते वहान अपघाता नंतर न थांबता निघून गेले आहे या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून  टायर गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत बळीराम यांच्या पक्षात वृद्ध आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. वरवडे टोल नाका येथील डॉ.महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी मृतास मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील गस्तीपथकाचे कर्मचारी आणि मोडनिंब  महामार्ग पोलिस मदत केंद्राचे  पोलीस उपनिरीक्षक किरण आवताडे व त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.