मुले होत नसल्याने महिलेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

मुले होत नसल्याने  एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरातील गचिनकट्टी कॉलनीत घडली आहे स्मिता राकेश (वय २८) असे त्या महिलेचे नाव असून लग्नाला आठ वर्षे झाली असूनही मुले होत नसल्याने महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समजून येते स्मिता हिचे आठ वर्षांपूर्वी बंगळुरू येथील राकेश नावाच्या मुलाशी विवाह झाले होते. ती महिला महिन्याभरापूर्वीच शहरातील गचिनकट्टी कॉलनीतील तिच्या मूळ गावी माहेरी आली होती.  मुले होत नसल्याने ती खूप चिंतेत होती आणि दोन दिवसांपूर्वीच तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिचा भाऊ सुनील बेल्लारी यांच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.