भारतीय अधिकाऱ्यांच्या मदतीने ६ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी वाँटेड सिंडी रॉड्रिग्ज सिंग भारतातून अटक

अमेरिका–भारत सहकार्याने मोठी कारवाई करत, एफबीआयने मोस्ट वॉन्टेड फरारी सिंडी रॉड्रिग्ज सिंगला भारतातून अटक केली
आहे. ६ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी वाँटेड असलेल्या सिंडीला आता अमेरिकेत
परत नेले जात असून, तिला टेक्सास पोलिसांच्या स्वाधीन केले
जाणार आहे.
घटना काय आहे?
१९८५ मध्ये जन्मलेली सिंडी रॉड्रिग्ज सिंग मूळची भारतीय वंशाची असून,
टेक्सासच्या डलासमध्ये राहत होती. २०२३ मध्ये तिच्या ६ वर्षांच्या
मुलगा नोएल अल्वारेझच्या हत्येचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. नोएल शेवटचा
ऑक्टोबर २०२२ मध्ये दिसला होता. मात्र सिंडीने पोलिसांना दिशाभूल करत सांगितले की
मुलगा त्याच्या जैविक वडिलांसोबत मेक्सिकोमध्ये आहे. चौकशीदरम्यान सिंडी पती आणि
सहा मुलांसह भारतात पळून आली, मात्र नोएल त्यांच्यासोबत
नव्हता. एफबीआय व भारतीय अधिकाऱ्यांची कारवाई
ऑक्टोबर २०२३ मध्ये सिंडीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, नोव्हेंबरमध्ये अटक वॉरंट जारी झाले. तिच्यावर २५ हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर
करण्यात आले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये इंटरपोलने रेड नोटीस जारी करून भारतासह सर्व
सदस्य देशांना माहिती दिली. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सिंडीला
भारतातून अटक करण्यात आली. एफबीआय संचालक काश पटेल यांचे वक्तव्य एफबीआय संचालक
काश पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी
म्हटले की, “एफबीआयने अमेरिकेतील टॉप १० फरारींपैकी एक
सिंडी रॉड्रिग्ज सिंगला अटक केली आहे. हे भारत व अमेरिकेच्या सहकार्याचे मोठे यश
आहे.”
पुढील प्रक्रिया
एफबीआयच्या माहितीनुसार, सिंडीला लवकरच
टेक्सासमध्ये पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. या खटल्यात आता अमेरिकन
न्यायालयात सुनावणी होणार आहे.