श्री सिद्धेश्वर बॅकेच्या अध्यक्षपदी बिज्जरगी, उपाध्यक्ष गंगनळ्ळी यांची बिनविरोध निवड
विजयपूर : जिल्ह्यातील प्रतिष्ठीत श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या
अध्यक्षपदी रविंद्र बिज्जरगी तर उपाध्यक्षपदी गुरुराज गंगनळ्ळी यांची बिनविरोध
निवड झाली आहे. बॅकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुक प्रक्रियेत त्यांची बिनविरोध
निवड करण्यात आली. या प्रसंगी बोलताना
नूतन अध्यक्ष रविंद्र बिज्जरगी म्हणाले, फ.गु. हलकट्टी यांनी सुरू केलेल्या या
बॅकेच्या प्रगतीसाठी सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांचा सहकार्याने प्रामाणिकपणे
प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या
प्रसंगी संचालक मंडळाचे सदस्य श्रीहर्षगौडा पाटील, रमेश
बिदनूर, गुरू गच्चीनमठ, सुरेश
गच्चीनकट्टी, विश्वनाथ पाटील, इरण्णा
पटनशेट्टी, राजेंद्र पाटील, विजयकुमार
इजेरी, वैजनाथ करपुरमठ, डॉ.संजिव पाटील,
प्रकाश बगली, राजशेखर कत्ती, अमोगसिद्ध नायकोडी, सायबण्णा भोवी, करुणा औरंगाबाद, सौभाग्य भोगशेट्टी, बोरम्मा गोब्बूर, व निवडणूक अधिकारी चेतन भावीकट्टी उपस्थित होते.