वैराग - धाराशिव मार्गावरील पुराचा बळी

वैराग, दि. २३ पावसाच्या महापुरामुळे बार्शी तालुक्यातील वैराग व परिसरामध्ये हाहाकार उडाला आहे. नद्यांचे पाणी घरात व शेतात शिरले आहे. त्यातच मंगळवारी वैराग - धाराशीव राज्य मार्गावरील मालेगाव येथील ओढ्याला आलेल्या पुरातून दुचाकी वरून जात असताना पाण्याच्या प्रवाह व रस्त्यातील खड्ड्यांमुळे गौडगाव ( ता. बार्शी ) येथील दुचाकी स्वाराचा पाण्यात पडून डोक्याला मार लागल्याने  जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद वैराग पोलिसात करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिली रामेश्वर केशव शिराळकर ( वय ४६ ) रा. गौडगाव ( ता. बार्शी ) असे मयत इसमाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मालेगावच्या ओढ्यात घडली.  पत्रकार, आण्णासाहेब कुरुलकर मो. 94 210 30 532