२०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना; जगभरातून अभिनंदनासह वादही
नोबेल पारितोषिक समितीने यंदाचा २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या
विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे. देशातील लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी अहिंसक संघर्ष केल्याबद्दल
त्यांना हा सन्मान मिळाला आहे. मात्र या निर्णयानंतर जगभरातून मिश्र प्रतिक्रिया उमटल्या
आहेत. अनेक देशांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, काही
संघटना आणि राजकीय नेत्यांनी हा पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. मचाडो या अमेरिकन
उजव्या विचारसरणीशी जवळच्या संबंधात असल्याच्या टीका होत आहेत. व्हाईट हाऊसने
देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, “नोबेल समितीने
शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले आहे,” असे वक्तव्य
अमेरिकन प्रशासनाकडून करण्यात आले. व्हेनेझुएलातील काही गटांच्या मते, या पुरस्कारामुळे मचाडो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन वाढेल,
तर त्यांच्या विरोधकांच्या मते, “त्या परदेशी
निर्बंधांना पाठिंबा देतात आणि त्यामुळे देशातील परिस्थिती अधिक बिकट झाली,”
असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेतील
मुस्लिम नागरी हक्क संघटना कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स (CAIR) यांनीही या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, “नोबेल समितीने हा पुरस्कार तत्काळ रद्द करावा.”mव्हेनेझुएलाच्या
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मचाडो यांच्यावर आरोप केला की, “त्या परदेशी शक्तींच्या मदतीने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करत
आहेत.” तसेच, काही डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी
त्यांच्यावर “इस्रायलच्या मुस्लिमविरोधी अजेंडाचे समर्थन” आणि
“अॅडॉल्फ हिटलरच्या विचारसरणीशी साधर्म्य” असल्याचे आरोपही
केले आहेत. व्हेनेझुएलाचे माजी उपराष्ट्रपती पाब्लो इग्लेसियास म्हणाले, “मचाडो सत्तापालटाचा प्रयत्न करत होत्या. जर असा ट्रेंड सुरू राहिला,
तर पुढच्या वर्षी पुतिन आणि झेलेन्स्की यांनाही नोबेल शांतता
पुरस्कार मिळू शकतो,”
असे त्यांनी व्यंगात्मक भाषेत म्हटले.