गुरुग्राममध्ये दुर्दैवी घटना — २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; लग्नाला अवघे ५ महिने
नवी दिल्ली :-
गुरुग्राममध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
२८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर शुभम मीणा यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या
केली आहे. फक्त पाच महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. राजस्थानच्या अलवर
जिल्ह्यातील शुभम काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट
झालं आहे.
प्रेमविवाहानंतर गुरुग्राममध्ये वास्तव्यास
शुभम राजस्थानचा रहिवासी असून, गुरुग्राममधील
एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता.
त्याचं वार्षिक पॅकेज सुमारे ₹२० लाख रुपये होतं.
काही महिन्यांपूर्वी त्याने दिल्लीतील एका युवतीसोबत प्रेमविवाह केला
आणि दोघे मिळून गुरुग्रामच्या नयागाव परिसरात भाड्याने राहायला आले होते.
घटनाक्रम — पत्नीला दिसला मृतदेह
मंगळवारी सकाळी शुभम बराच वेळ बाहेर न आल्याने,
त्याची पत्नी त्याला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली.
तेव्हा तिला शुभमचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
तिने तत्काळ शेजाऱ्यांना माहिती दिली आणि पोलिसांना कळवले.
पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून तपास सुरू केला.
सुसाईड नोट नाही, तणावामुळे आत्महत्येची शक्यता
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे. तथापि, चौकशीत समोर आलं की शुभम काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्याच्यावर
उपचार सुरू होते आणि तो औषधं घेत होता, अशी माहिती त्याच्या
नातेवाईकांनी दिली.
काही स्रोतांनी सांगितलं की शुभमने पूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला
होता, मात्र पोलिसांनी याची अधिकृत पुष्टी अद्याप केलेली
नाही.
मोबाईल तपास सुरू
पोलिसांनी शुभमचा मोबाईल फोन जप्त केला असून,
त्यातून काही धागेदोरे किंवा वैयक्तिक संदेश सापडतात का याची चौकशी
सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास गुरुग्राम पोलिस करत आहेत.