सुदानमधील दुर्दैवी भूस्खलन: हजारो जीवांचा

सुदानमध्ये नैसर्गिक आपत्तीने हाहाकार माजवला आहे. पश्चिम सुदानमधील मारा पर्वत (Jebel Marra) परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत किमान 1,000 लोकांचा मृत्यू झाला, तर फक्त एक व्यक्ती चमत्कारिकरीत्या जिवंत वाचली आहे. ही माहिती सुदान मुक्ती चळवळ/लष्कर (SLM/A) ने अधिकृत निवेदनात दिली आहे. संघटनेचे नेतृत्व अब्दुलवाहिद मोहम्मद नूर करत असून, त्यांनी सांगितले की, परिसरात सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी हे भूस्खलन घडले.
परिस्थिती आणखी गंभीर
- गाव पूर्णपणे
जमीनदोस्त झाले असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
- मृतांमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
- दुर्घटनेनंतर आरएसएफ
(Rapid Support
Force) च्या
हल्ल्यामुळे १०० हून अधिक लोक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन
SLM/A ने संयुक्त राष्ट्र (UN)
आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन
केले आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की –
- मृतदेह बाहेर
काढण्यासाठी मदत हवी.
- बाधित कुटुंबांना
अन्न व औषधांची तातडीची आवश्यकता आहे.
सुदानमधील गंभीर परिस्थिती
ही दुर्घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा सुदान आधीच गृहयुद्धाच्या
भीषण संकटाचा सामना करत आहे.
- गेल्या दोन
वर्षांपासून सुदानी सैन्य व निमलष्करी आरएसएफमध्ये संघर्ष सुरू आहे.
- उत्तर दारफुरमध्ये
लाखो लोकांनी मारा पर्वतांमध्ये आश्रय घेतला होता.
- मात्र येथे अन्न व
औषधांचा प्रचंड तुटवडा आहे.
- सध्या सुदानमधील अर्ध्याहून
अधिक लोक उपासमारीच्या विळख्यात सापडले आहेत.