श्री. न. फू. शहा कोठारी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा...

सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूल मध्ये आज विविध पारंपरिक खेळांनी राष्टीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मेहता आर.आर.श्री बिडवे एस.ए.उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रमुख मान्यवरांचे शाल बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. बिडवे एस. ए.यांनी खेळाचे जीवनातील महत्व आपल्या मनोगतातून सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी खेळ व खेळाचे प्रकार सांगून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडादिनाचे शुभेच्छा दिले.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित प्रशालेत विविध पारंपरिक खेळ घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माने ए. एस. तर आभार श्री. पाटील बी. एस. यांनी मानले.