सोलापूरात थरार! भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे भरदिवसा अपहरण

सोलापूरात एक थरारक राजकीय गुन्हा उघडकीस आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक समितीचे सदस्य शरणू हांडे यांना गुरुवारी संध्याकाळी साईनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी मारहाण करत अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली.

 शरणू हांडे एका बिअर शॉपीसमोर थांबले असताना ४-५ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला व कारमध्ये जबरदस्तीने टाकून अक्कलकोट रस्त्याकडे आणि नंतर कर्नाटकात झळकी येथे घेऊन गेले. पोलिसांनी तातडीने हालचाल करत मोबाइल लोकेशनच्या साहाय्याने झळकी येथे चार आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी अमित सुरवसे आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरणू हांडे गंभीर जखमी

  • हॉकी स्टिकने छाती व शरीरावर मारहाण
  • मांडीवर खोल जखम – डॉक्टरांनी ५ टाके घातले
  • हातपाय बांधून कारमध्ये नेण्यात आले

राजकीय सूडाची शक्यता

  • २०११ मध्ये आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक
  • यानंतर हांडे व आरोपींमध्ये वाद
  • जुन्या रागातून हे अपहरण झाल्याची शक्यता

 

पोलीस कारवाई

  • एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • मोठा पोलिस बंदोबस्त
  • आरोपी कर्नाटकातून रात्री ११ वाजता सोलापूरात आणले

पडळकर समर्थकांचा संताप

  • रात्री शासकीय रुग्णालयाबाहेर जमाव
  • पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला
  • आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडे यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली