मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ; तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

पुणे :-  येरवड्यातील शास्त्री चौक परिसरात शनिवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला सांगाडा आढळल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. नगर रस्त्यावरील एका लॉजसमोर सांगाडा पडलेला दिसल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. मानवी सांगाडा असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तपासाअंती हा सांगाडा मानवी नसून प्रयोगशाळेत वापरण्यात येणारा प्लास्टर ऑफ पॅरिसचा कृत्रिम सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांचे आवाहन : या घटनेबाबत कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.