उत्तरकाशीतील आपत्तीने देश हादरला, ६ मृत, २७४ यात्रेकरूंची सुटका

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या ढिगाऱ्यामुळे संपूर्ण परिसरात भीषण हाहाकार माजला.

डोंगरावरून खाली आलेल्या पाण्याच्या प्रवाहासह माती, दगड आणि झाडांनी अनेक घरे, दुकाने व बाजारपेठा नष्ट झाली.

या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह सापडले असून, अनेक जण बेपत्ता आहेत. लष्कर, NDRF आणि SDRF ची पथके सध्या बचाव व शोध मोहीमेत गुंतलेली आहेत.

राज्य यंत्रणा सज्ज राज्याचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांनी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर, डेहराडून येथे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी माहिती दिली की, "बचाव कार्यात गती आणण्यासाठी MI-17 आणि चिनूक हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे." मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी स्वतः घटनास्थळी उपस्थित असून, मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरु आहे. २७४ यात्रेकरूंची सुरक्षित सुटका प्रशासनाने आतापर्यंत २७४ यात्रेकरूंना हर्षिल येथे सुरक्षित आणले आहे.
त्यात खालील राज्यांतील यात्रेकरूंचा समावेश आहे:

  • गुजरात – १३१
  • महाराष्ट्र – १२३
  • मध्य प्रदेश – २१
  • उत्तर प्रदेश – १२
  • राजस्थान – ६
  • दिल्ली – ७
  • आसाम – ५
  • कर्नाटक – ५
  • तेलंगणा – ३
  • पंजाब – १

अधिकाऱ्यांची तत्परता आणि बचाव कार्य सुरूच

  • आजपर्यंत एकूण १३५ जणांची यशस्वी सुटका
  • १०० जणांना उत्तरकाशीला, ३५ जणांना देहरादूनला हलवले
  • NDRF, SDRF, ITBP, लष्कर, पोलिस आणि प्रशासन एकत्र काम करत आहेत
  • मुख्यमंत्री सतत ऑपरेशनचा आढावा घेत आहेत आणि दोन हेलिकॉप्टर कार्यरत आहेत

ही दुर्घटना राज्यासाठी मोठं आव्हान ठरत असली तरी प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध अद्याप सुरु आहे.