लातूरमध्ये भीषण अपघात : औसा-निलंगा महामार्गावर बहिण-भावाचा जागीच मृत्यू
लातूर— औसा-निलंगा राष्ट्रीय महामार्गावर आज
दुपारी घडलेल्या भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भाऊ जागीच ठार झाले. मृतांमध्ये प्रसाद
शिंदे आणि गायत्री शिंदे (मुले पद्माकर शिंदे) यांचा समावेश
आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडी आणि ट्रकच्या
दरम्यान आलेल्या दुचाकीला दोन्ही वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेत
दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले
आहेत.
घटना कशी घडली?
बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी प्रसाद शिंदे आणि गायत्री शिंदे हे
दुचाकीवरून लातूरकडे निघाले होते. औसा शहरातील पोतदार शाळेसमोर बोलेरो आणि
ट्रकच्या मध्ये त्यांची दुचाकी अडकली. बोलेरोने दिलेल्या जोरदार धडकेनंतर दोघे
रस्त्यावर पडले, त्याच वेळी ट्रकने त्यांना चिरडले.
पोलिसांची
तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा
करून दोन्ही वाहनांचा शोध सुरू करण्यात आला आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ
वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मुख्य
मुद्दे :
- औसा-निलंगा
महामार्गावर भीषण अपघात
- वाघोली येथील
बहिण-भाऊ जागीच ठार
- बोलेरो आणि ट्रकच्या
दरम्यान दुचाकी अडकली
- दोन्ही वाहनचालक
फरार, पोलिसांचा
शोध सुरू