TATA Motors Cyber Attack: JLR वर सायबर हल्ल्यामुळे टाटा मोटर्सला अब्जावधींचं नुकसान; शेअर्समध्ये मोठी घसरण
मुंबई | २५ सप्टेंबर २०२५
टाटा मोटर्सला त्यांच्या ब्रिटनमधील जग्वार लँड रोव्हर (JLR)
या उपकंपनीवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्याचा जबरदस्त फटका बसला
आहे. फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार
JLR वर झालेल्या या हल्ल्यामुळे कंपनीला आपले अनेक कारखाने बंद
करावे लागले. त्यामुळे अंदाजे २ बिलियन पाउंड (₹२,३८,६१,६६,००,०००) इतकं नुकसान होऊ शकतं. शेअर बाजारावर परिणाम बुधवारी बीएसईवर टाटा
मोटर्सचा शेअर जवळपास ४% घसरून ₹६५५.३० वर आला. मागील सत्रात
तो २.७% घसरून ₹६८२.७५ रुपयांवर बंद झाला होता. उत्पादन ठप्प
आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम
सायबर हल्ल्यामुळे JLR चं उत्पादन २४
सप्टेंबरपर्यंत थांबवण्यात आलं होतं, परंतु ते आता १
ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलं आहे. यामुळे कंपनीच्या सुमारे ३३,००० कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. अंदाजे JLR
ला दर आठवड्याला ५० दशलक्ष पाउंड (६८ दशलक्ष डॉलर) नुकसान होत
असल्याचं सांगण्यात येत आहे. मोठं आर्थिक संकट
२०२५ आर्थिक वर्षात JLR ने १.८ बिलियन पाउंडचा
नफा (करानंतर) कमावला होता. मात्र, सध्याचं
अंदाजित नुकसान या संपूर्ण नफ्यालाही झाकोळून टाकू शकतं. विमा पॉलिसीची कमतरता सायबर
हल्ल्याच्या आधी JLR ने विमा पॉलिसी अंतिम केली नव्हती. ‘लॉकटन’ या जागतिक विमा ब्रोकरेज फर्मसोबत
प्रक्रिया सुरू होती, परंतु पॉलिसी पूर्ण झाली नव्हती.
त्यामुळे नुकसान थेट कंपनीलाच सहन करावं लागणार आहे.
हायलाइट्स
- JLR वर
मोठा सायबर हल्ला
- टाटा मोटर्सला २
बिलियन पाउंडचं संभाव्य नुकसान
- शेअर्स ४% घसरले
- ३३,००० कर्मचाऱ्यांना घरी बसवावं लागलं
- विमा पॉलिसी अद्याप
अपूर्ण