नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की; संसद बरखास्त, हिंसक आंदोलने व आर्थिक संकटाचे मोठे आव्हान

काठमांडू | १3 सप्टेंबर २०२५
नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक संकटाच्या
पार्श्वभूमीवर माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी आज अंतरिम पंतप्रधान म्हणून
शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिली. कार्की या नेपाळचे
नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.
सत्ताबदल Gen Z आंदोलकांच्या दबावामुळे
- Gen Z आंदोलकांनी अंतरिम सरकारसाठी कार्की यांच्यासह काठमांडू महापौर बालेंद्र
शाह आणि वीज मंडळाचे माजी सीईओ कुलमन घीसिंग यांची नावे सुचवली
होती.
- आंदोलकांनी सरकारी
इमारती, पक्ष
कार्यालये आणि नेत्यांच्या घरांना आग लावून सरकारविरुद्ध आक्रोश व्यक्त केला.
- या हिंसक
निदर्शनांमुळे केपी शर्मा ओली सरकारने राजीनामा दिला.
हिंसक निदर्शने आणि लष्करी तैनाती
- आतापर्यंत ५१
जणांचा मृत्यू.
- देशातील प्रमुख
शहरांत लष्करी जवान तैनात.
- परिस्थिती
नियंत्रणात आणण्यासाठी संसद बरखास्त करण्याचा निर्णय.
आर्थिक आव्हान
- हिंसक आंदोलनामुळे
देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका.
- सुशीला कार्की
यांच्यासमोर आर्थिक पुनर्बांधणीचे कठीण आव्हान.
सुशीला कार्की : परिचय
- जन्म : ७ जून
१९५२, विराटनगर,
नेपाळ
- शिक्षण : बनारस
हिंदू विद्यापीठ (राज्यशास्त्रात पदव्युत्तर, १९७५), त्रिभुवन
विद्यापीठ (कायदा, १९७८)
- सरन्यायाधीश : २०१६-२०१७
- पती : दुर्गा
प्रसाद सुबेदी, नेपाळी
काँग्रेसचे वरिष्ठ नेते
- बनारसशी खास संबंध –
शिक्षणकाळातच विवाह