श्रीलंकेत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; दित्वाह चक्रिवादळात ६१८ मृत, २० लाखांवर लोक प्रभावित
कोलंबो : दित्वाह चक्रिवादळामुळे कोलमडलेल्या श्रीलंकेची
परिस्थिती अजून स्थिरावत नाहीये. वादळाच्या विनाशानंतर आता पुन्हा अतिवृष्टी आणि
दरडी कोसळण्याचा गंभीर इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रविवारी अधिकृत सूचना
जारी करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
दित्वाह चक्रिवादळाचा तडाखा — ६१८ मृत, लाखो प्रभावित
श्रीलंकेच्या प्रशासनाच्या माहितीनुसार, दित्वाह चक्रिवादळ हे गेल्या दशकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती ठरले
आहे.
- ६१८ जणांचा मृत्यू
- अनेकजण अजूनही
बेपत्ता
- दुर्गम भागांत मदत
पोहोचण्यात अडथळे
अनेक प्रभावित प्रदेशांमध्ये बचावपथके पोहचू शकलेली
नसल्याने हेलिकॉप्टर आणि हलकी विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
हजारो घरे उद्ध्वस्त, २.२५ लाख नागरिक छावण्यांमध्ये
वादळामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
- ५,००० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त
- ७५,००० घरे अंशतः नुकसानग्रस्त
- सुमारे २.२५ लाख
लोकांनी तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला
सलग दोन आठवड्यांच्या मुसळधार पावसामुळे श्रीलंकेच्या
आग्नेय आणि मध्य भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक रस्ते वाहून गेल्याने
संवाद तुटला आहे.
पून्हा दरडी कोसळण्याचा धोका
डोंगराळ भागात पुन्हा दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला
असून पावसाचा धोका अजूनही कायम असल्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राने सांगितले.
एकट्या श्रीलंकेत २० लाख लोकांना, म्हणजेच
देशाच्या लोकसंख्येच्या १०% लोकांना, चक्रिवादळाचा जबर फटका
बसला आहे.
आशियातील इतर देशांनाही मोठा फटका
श्रीलंकेव्यतिरिक्त,
- इंडोनेशिया
- मलेशिया
- थायलंड
- व्हिएतनाम