सोलापूर हादरलं : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याचे तीन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सोलापूर शहरात समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली
आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे
उघड झाले असून, या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात
पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
जुलै २०२२ मध्ये घरगुती वादातून पीडितेच्या आईला घराबाहेर काढण्यात
आले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी घरात एकटी उरल्याने तिच्याच वडिलांनी पहिल्यांदा
अश्लील कृत्य केले. त्यानंतर २ जुलै २०२५ पर्यंत या प्रकाराची वारंवार पुनरावृत्ती
झाली.
पीडितेला दिली धमकी
घटनेनंतर वडिलांनी पीडितेला धमकी दिली की, जर
तू कुणाला सांगितलंस तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकीन. भीतीपोटी मुलीने बराच
काळ मौन पाळले. मात्र अखेर २५ जुलै रोजी तिने धैर्य दाखवत पोलिस ठाण्यात तक्रार
दिली.
पोलिसांची कारवाई
तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा
तपास महिला पोलिस अधिकारी करत आहेत. आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा तसेच बलात्कारासह
इतर गंभीर कलमांखाली कारवाई सुरू आहे.