गांधी चौक पोलीस ठाण्यात वाहतूक नियंत्रण कमांड सेंटर स्थापनेसाठी सिद्धसिरी सौहार्द संस्थेकडून ₹ २५ लाखांची देणगी

विजयपूर :- विजयपूर शहरातील *गांधी चौक पोलीस ठाण्यात वाहतूक नियंत्रण कमांड सेंटर (Traffic Command Center) स्थापन करण्यासाठी, शहर आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांच्या अध्यक्षतेखालील सिद्धसिरी सौहार्द सहकारी संस्थेकडून कडून*₹२५ लाखांची देणगी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक *लक्ष्मण निंबरगी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी नि. आणि *सिद्धसिरी सौहार्द सहकारी संस्थेचे संचालक रामनगौडा पाटील यतनाळ यांनी यावेळी सांगितले की, "विजयपूर शहर हे वेगाने विस्तारत आहे. शहराच्या वाढीसोबतच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. अपघात टाळण्यासाठी, वाहतूक सुरळीतपणे नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करणारे कमांड सेंटर आवश्यक आहे." या कमांड सेंटरमध्ये *प्रमुख चौकांचे व्हिज्युअल मॉनिटरिंग, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) आणि संपर्क साधनांचे समन्वित व्यवस्थापन यांचा समावेश असेल. जिल्हा पोलीस विभागाने आर्थिक मदतीची विनंती केल्यानंतर, सिद्धसिरी संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत ₹२५ लाखांची मदत जाहीर केली. यावेळी सिद्धसिरी सौहार्द सहकारी संस्थेचे संचालक प्रभु गौडा देसाई, जगदीश क्षत्री व्यवस्थापकीय संचालक *ज्योतिबा खंडागळे महाप्रबंधक उमेश हारिवाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.