शुबमन गिलचा विक्रमांचा पाऊस! रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये शतकांचा बादशाह ठरला

पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार Shubman Gill याने आपल्या फलंदाजीचा धडाका दाखवत इतिहास रचला. त्याने 129 धावांची भक्कम खेळी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अक्षरशः नाकीनऊ आणले
त्याच्या स्फूर्तिदायी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 518 धावांचा डोंगर उभा करून पारी घोषित केली. गिल व्यतिरिक्त Yashasvi Jaiswal ने 175 धावा झळकावल्या, तर Sai Sudharsan ने 87 धावांचे योगदान दिले.

गिलचा विक्रमांचा पाऊस:

  • डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा भारतीय फलंदाजगिलचे हे 10 वे शतक.
  •  Rohit Sharma याचा विक्रम मोडला (9 शतके).
  •  WTC मध्ये 10 शतके झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज.

 

कर्णधार म्हणूनही इतिहास:

गिलने कर्णधार म्हणून खेळताना देखील मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

  •  कर्णधार म्हणून WTC मध्ये 5 शतके,
  •  रोहित शर्मा (4) आणि Babar Azam (4) यांना मागे टाकले.

त्यामुळे आता शुबमन गिल हा WTC मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके झळकवणारा भारतीय ठरला आहे.