श्रीहर्षगौडा पाटील यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

विजयपूर:- जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात कार्यरत असलेले , सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष श्रीहर्षगौडा पाटील यांची विजयपूर जिल्हा
सहकारी युनियनचा संचालक मंडळाच्या
निवडणुकीत संचालक सदस्य म्हणून सलग
तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
‘सहकार’ ही संकल्पना ही लोकांची एकजूट, विश्वास आणि समतेच्या आधारे फुलत जाते. या चळवळीला निष्ठेने विकसित
करण्यात श्रीहर्षगौडा पाटील यांची भूमिका अमूल्य आहे. त्यांचा साधा स्वभाव,
सहज वागणूक आणि सर्वांशी संवाद साधण्याची हृदयस्पर्शी शैली यामुळे
ते सामान्य जनतेच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत. अधिकार, पद,
प्रतिष्ठा यामागे धावण्याऐवजी लोकांचे हित जपणे हेच त्यांचे प्रथम
प्राधान्य राहिले आहे. त्यामुळेच अशा सन्माननीय पदे पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे
येत आहेत.
विजयपूर
जिल्ह्याच्या सहकारी चळवळीला नवीन दिशा देण्यासाठी त्यांनी हाती घेतलेली अनेक
कार्यक्रमे, प्रशिक्षण शिबिरे इत्यादी सर्व उपक्रम
यशस्वीपणे पार पाडली आहेत श्रीहर्षगौडा पाटील यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात आणि
सार्वजनिक सेवेत नेहमीच शिस्त, साधेपणा आणि नैतिकतेला
प्राधान्य दिले आहे. “सेवाच श्रेष्ठ धर्म आहे” हे तत्त्व त्यांनी खऱ्या अर्थाने
जीवनात उतरवले आहे. अशा व्यक्तींवर जनता नेहमीच विश्वास ठेवते आणि त्यांना पदे
बहाल करते. पुढील काळात सहकारी चळवळीला
अधिक बळकटी देण्यासाठी त्यांनी अधिक नवनव्या योजना राबवाव्यात आणि जिल्ह्यातील
सहकारी संस्थांना स्वावलंबी, पारदर्शक आणि आदर्श बनवावे,
हीच सर्वांची अपेक्षा आहे.