श्री शिवाजी महाराज सोसायटीस रु १कोटी ४ लाख निव्वळ नफा

विजयपूर:- विजयपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित आणि राज्य पुरस्कारप्राप्त श्री
शिवाजी महाराज को-ऑप. क्रेडिट सोसायटी ही
वर्षानुवर्षे नफ्यात वाढ नोंदवून उल्लेखनीय प्रगती करत आहे. मार्च 2025 अखेर
सोसायटीस* रु 1 कोटी 4 लाख कोटींचा निव्वळ नफा कमावला असून सदस्यांना *12% लाभांश
जाहीर केला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष शंकर कणसे होते आणि
उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत ज्येष्ठ
संचालक श्री बाबूराव तरसे यांनी केले. विजयपूर शहरातील *श्री कालिदास शिक्षण
संस्थेच्या प्रांगणात संस्थेची सन 2024–25 साठीची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार
पडली. यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ. सदाशिव पवार म्हणाले, "सोसायटीने 28 वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण केली आहे, ही
आपल्या जिल्ह्यातील सर्व सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. पतपुरवठा व्यवहार
आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत, संस्था सदस्यांना
आर्थिक मदत पुरवून जिल्ह्यातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी
सातत्याने प्रयत्नशील आहे."
सोसायटीचे वार्षिक अहवाल
मांडताना उपाध्यक्ष संजय जंबुरे म्हणाले, “आपली संस्था दरवर्षी नफ्यात वाढ करून, सदस्यांमध्ये विश्वास आणि विश्वासार्हता निर्माण करत आहे. आज जिल्ह्यातील
लोक ‘आपली शिवाजी बँक म्हणून अभिमानाने संबोधतात. यामागे संस्था चालवणाऱ्या
पदाधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची आणि सदस्यांची मेहनत आहे,
हे सांगणे अतिशयोक्ती ठरणार नाही.असे सांगितले 2024–25 या आर्थिक वर्षात ₹1.04 कोटी निव्वळ
नफा कमावण्यात संस्थेला यश आले असून, यावर्षी सदस्यांना
त्यांच्या भागभांडवलावर 12% लाभांश* देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी अभिमानाने
सांगितले. व्यावसायिक व्यवस्थापन ही संस्थेची खासियत असून, जिल्ह्यातील
सहकारी संस्थांमध्ये नावीन्यपूर्ण योजनांमुळे “*उत्कृष्ट सहकारी संस्था” अशी ओळख
निर्माण झाली आहे. सोसायटीने समाजाचा आणि सदस्यांचा प्रेम, विश्वास
व सन्मान मिळवून, आपला **रौप्य महोत्सव* अतिशय उत्साहात
साजरा केला आहे
सध्या सोसायटीचे *5,141 सदस्य असून, ती एक वटवृक्षासारखी बहरली आहे. संस्थेकडे: रु 3.23
कोटी भागभांडवल रु 71 कोटी ठेव, रु 3.75 कोटी राखीव निधी, रु 5.04 कोटी इतर निधी*
रु61.01 कोटी कर्जवसुली आणि आगाऊ कर्ज * रु 83.04 कोटी कार्यरत भांडवल असल्याचे
सांगण्यात आले. तसेच 2024–25 या चालू वर्षात ₹19.06 कोटींचे कर्ज वाटप* करण्यात
आले असून, रु11.96 कोटी कर्जाची वसुली करण्यात आली आहे.
याच वेळी, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्य ज्योतिराम पवार, श्रीमती
माया लुगडे (जमादार), सुरेश जट्टी आणि मल्लिकार्जुन
सोड्डी** यांचा सत्कार करण्यात आला. तसेच *80 हुशार विद्यार्थ्यांना ‘प्रतिभा
पुरस्कार’ आणि 10 ज्येष्ठ सदस्यांना वॉकिंग स्टिक्स देण्यात आल्या. कार्यक्रमात
संचालक बाबूराव तरसे, डॉ. सदाशिव पवार, प्रविण बोडके, रामचंद्र चव्हाण, श्रीमती सरोजिनी निक्कम, श्रीमती अंबुताई जाधव, श्रीमती सुरेखा कदम, रवी मदभावी, भारत देवकुळे, पांडुरंग रोहिते**, तसेच मुख्य व्यवस्थापक संजय जाधव
व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, अंबादास चव्हाण सोसायटीचे
कर्मचारी, पिग्मी एजंट्स आणि मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
विठ्ठल चव्हाण यांनी केले आणि
रामचंद्र चव्हाण** यांनी आभार मानले.