अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील घराबाहेर गोळीबार; गोल्डी ब्रार टोळीची जबाबदारी, पोलिसांचा तपास सुरू

बरेली | १3 सप्टेंबर २०२५
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे
परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात रोहित गोदरा आणि गोल्डी
ब्रार टोळीने स्वीकारली आहे.
घटनेचा
तपशील
- दोन अज्ञात
व्यक्तींनी विदेशी गनने ८-१० राऊंड्स फायरिंग केले.
- झोपेतून जागे
झाल्यावर कुटुंबाने कसंबसं स्वतःचा बचाव केला.
- हल्ल्यानंतर परिसरात
दहशतीचे वातावरण.
वडिलांचा खुलासा – “कसंबसं वाचलो”
दिशा पटानीचे वडील जगदिश सिंह पटानी यांनी एनआयला
दिलेल्या मुलाखतीत सांगितले:
“फायरिंग सुरू झाली, आम्ही
सर्वजण दहशतीत होतो. बाहेर जायचा प्रयत्न केला, पण कसंबसं
वाचलो. गोल्डी ब्रारने जबाबदारी घेतली असली तरी अजून सिद्ध झालेलं नाही. संविधानात
आपलं म्हणण्याचा अधिकार आहे.”
कारण
काय?
- काही महिन्यांपूर्वी
दिशाची बहिण खुशबू पटानीने आध्यात्मिक गुरू अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर
टीका करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
- त्यावरून घरावर
गोळीबार केल्याचा संशय.
- जगदिश पटानी म्हणाले, “खुशबूचं वक्तव्य मोडून तोडून
दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न.”
सुरक्षा
आणि तपास
- उत्तर प्रदेश
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
- जगदिश पटानी यांनी
विश्वास व्यक्त केला:
“हा योगीजींचा प्रदेश आहे. ते गुंडागर्दीवर
नक्कीच लगाम लावतील.”