रायगडमध्ये धक्कादायक घटना : उरण करंजा समुद्रात गुजरातची मासेमारी बोट बुडाली, बचावकार्य सुरू

रायगड :- रायगड
जिल्ह्यातील उरण करंजा समुद्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी
साडेनऊ वाजता करंजा रिप्स परिसरात गुजरातची मासेमारी बोट बुडाल्याची माहिती
मिळाली. घटनेनंतर सीआयएसएफ व नौदलाच्या गस्त नौकाद्वारे तातडीने बचावकार्य सुरू
करण्यात आले. मात्र या अपघाताचे कारण काय होते, बोटीवर नेमके
किती खलाशी होते आणि जिवीतहानी झाली आहे का, याबाबत अद्याप
अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वादळी हवामानामुळे मासेमारीवर बंदी असतानाही ही
बोट समुद्रात कशी आली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गुजरातची
ही बोट रायगड किनाऱ्यावर कशी आली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. स्थानिक
प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांना
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.