बिलासपूरमध्ये धक्कादायक प्रकार! रॅपिडो रायडरच्या डोळ्यात महिलेकडून मिरची पूड फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
बिलासपूर (छत्तीसगड) :- छत्तीसगडमधील
बिलासपूर शहरातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
रॅपिडो रायडरला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर एका महिलेनं त्याच्या
डोळ्यात मिरची पूड फेकून हल्ला केला, असा आरोप आहे. हा
प्रकार मोबाईलमध्ये टिपण्यात आला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय दिसतं व्हिडीओमध्ये?
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला आणि रॅपिडो रायडर यांच्यात पैशांवरून
वाद होताना दिसतो.
वाद वाढताच रायडर रागावतो आणि अपशब्द वापरतो. त्यानंतर महिला
त्याच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकते आणि बाईकवर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीवरही हल्ला
करते.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आसपासच्या लोकांनी रेकॉर्ड केला आणि तो
आता इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल
मीडियावर संतापाचा स्फोट
इन्स्टाग्रामवरील @indians या हँडलवर पोस्ट
करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत
➡️ २७ लाख व्ह्यूज,
➡️ ६० हजारांहून अधिक लाईक्स आणि
➡️ ८०० हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
नेटिझन्सनी महिलेच्या वर्तनाचा तीव्र निषेध व्यक्त केला
आहे.
काहींनी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून रायडरला न्याय द्यावा,
अशी मागणी केली आहे.
प्राथमिक
माहितीप्रमाणे
- महिलेने रॅपिडो अॅपवर
बाईक बुक केली होती.
- ठरलेल्या लोकेशनवर
पोहोचल्यानंतर तिने भाडं देण्यास नकार दिला.
- रायडरने पैसे
देण्याचा आग्रह धरल्यानंतर वाद झाला आणि त्यानंतर हल्ला झाला.
- हल्ल्यानंतर
रायडरच्या डोळ्यांना जखम झाली असून, त्याला रुग्णालयात उपचारासाठी
नेण्यात आले.