धक्कादायक! पाण्यावरून वाद, अभियंत्याने पत्नीची हत्या करून आईच्या मदतीने मृतदेह जाळला

सिंगरौली (मध्य प्रदेश) : मध्य
प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील विंध्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक
घटना उघडकीस आली आहे. एनटीपीसी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत निखिल दुबे याने
पत्नी आभाची निर्घृण हत्या केली. ही घटना १५ ऑगस्ट रोजी एनटीपीसी कॉलनीत घडली. पोलिसांच्या
माहितीनुसार, निखिलने पत्नी आभाकडे पाणी मागितले होते.
यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात निखिलने आभाचं डोकं स्वयंपाकघरातील
स्प्रॅबवर आपटलं, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. आईच्या
मदतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या
निखिलने आई दुर्गेश्वरी देवी हिच्या मदतीने मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून
कारमधून प्रयागराज येथे नेला. शंकरघाटवरील विद्युत शवदाहगृहात मृतदेह जाळण्यात
आला. सीसीटीव्हीमुळे उघडकीस आले सत्य आभाचे वडील सुनील दुबे यांनी तक्रार
दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला काहीच हाती न लागल्याने
पोलिसांनी प्रयागराजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात निखिलने पत्नीचा मृतदेह
ब्लँकेटमध्ये ठेवून कारमध्ये नेल्याचे स्पष्ट दिसले. पोलिसांच्या नजरेतून
वाचण्यासाठी त्याने गाडीच्या काचेला पडदे लावले होते. या पुराव्यांच्या आधारे
पोलिसांनी निखिल दुबे आणि त्याची आई दुर्गेश्वरी देवी यांना प्रयागराजच्या
शास्त्री नगरमधून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.