शिवसेनेतर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वही, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप — वांगी (दक्षिण सोलापूर) येथे उपक्रम

वांगी (दक्षिण सोलापूर) :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब तसेच शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत १३० डझन (१५६० नग) वह्यांचे वितरण करण्यात आले, तसेच अन्नधान्य किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन
हा उपक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अमोल बापू शिंदे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अमरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

प्रमुख उपस्थिती:
प्रभाकर भाऊ गायकवाड, वैभव जवळकोटे मित्रपरिवार, किरण तोडकरी, धर्मराज खडाकडे, माजिद बागवान यांच्यासह असंख्य शिवसैनिक, विद्यार्थी आणि माता-भगिनींची उपस्थिती लाभली.

सामाजिक बांधिलकीचा संदेश
शिवसेनेच्या या उपक्रमाद्वारे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक सहाय्य मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. या वाटप सोहळ्याद्वारे शिवसेनेची जनसंपर्क व सेवा भावनेची परंपरा अधोरेखित झाली.