विजयपूरची युवती शिफा रशियातील जागतिक युवक परिषदेमध्ये सहभागी होणार

विजयपूर - रशियाची राजधानी मॉस्को येथे दिनांक २२ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर
२०२५ पर्यंत आठ दिवस चालणाऱ्या *जागतिक युवक परिषदेमध्ये* भारताचे प्रतिनिधित्व
करण्यासाठी विजयपूरच्या *कु. शिफा जमादार
हिची निवड झाली असून, हे विजयपूर जिल्ह्याच्या इतिहासात एक नवे पर्व ठरले
आहे.
प्रथमच जागतिक पातळीवरील
परिषदेमध्ये विजयपूरची एक प्रतिभावंत युवती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, ही
बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. *जागतिक अणु दिनाच्या* पार्श्वभूमीवर रशियन
सरकारने मॉस्कोमध्ये या युवक शिखर परिषदेला आमंत्रण दिले असून, भारताकडून एक युवक व एक युवती यात सहभागी होत आहेत. विजयपूरच्या शिफा
जमादार हिला मिळालेला हा दुर्मिळ व मानाचा संधी मिळाली
एकूण १६० देशांचे युवक
प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.
या वेळी *"जागतिक शांततेमध्ये युवकांची भूमिका"* या विषयावर
शिफा जमादार आपले विचार मांडणार आहेत.
आपल्या शिक्षणाबरोबरच
समाजसेवेमध्येही सक्रीय असलेल्या कु. शिफा जमादार यांनी युवती सशक्तीकरणासाठी मोठे
योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत ३.५ कोटी रुपयांच्या
निधीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित
स्वच्छतागृहे**, गरजू विद्यार्थ्यांसाठी *स्कूल बॅग, लेखन साहित्य, जिओमेट्री बॉक्ससहित ८,००० शैक्षणिक किटचे वितरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
तसेच त्यांनी युवतींमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयी जागरूकता निर्माण
करणे, प्राथमिक
शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, पर्यावरण
जनजागृती यांसारख्या अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. *कन्नड, इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये प्रभुत्व असलेल्या शिफा या आपल्या विचार
प्रभावीपणे मांडण्याची क्षमता बाळगतात.
शिफा जमादार दिल्लीमार्गे
रशियाची राजधानी मॉस्कोकडे प्रवास करणार असून, त्यांच्या प्रवासाचे सर्व खर्च रशियन सरकारकडून केले
जाणार आहेत.
*"ही संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो..."*
"भारत हा महान इतिहास व ज्ञानाची परंपरा असलेला देश आहे.
शांततेचा संदेश देणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. अशा देशाचे प्रतिनिधित्व करणे
माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. माझे पालक, शिक्षक आणि संपूर्ण विजयपूर जिल्ह्याचे लोक यांचे मी
मनःपूर्वक आभार मानते. आजच्या काळात जागतिक शांततेची गरज असून, हाच विषय चर्चेसाठी या परिषदेत दिला गेला आहे," असे कु. शिफा जमादार यांनी आपले मत व्यक्त केले.