शरद पवारांचा खुलासा : विधानसभा निवडणुकीआधी १६० जागांची ‘गॅरंटी’ देणारे दोन अनोळखी भेटले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांनंतर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा
खुलासा केला आहे. नागपूरमधील पत्रकार परिषदेत पवार यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये दोन व्यक्ती भेटले
आणि महाराष्ट्रातील २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी दिली. |
पवार म्हणाले, "त्यांची नावे-पत्ते माझ्याकडे
नव्हते आणि मी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. मात्र, त्यांच्या
भेटीची मी राहुल गांधींशी ओळख करून दिली आणि त्यांनीही ते ऐकले. शेवटी आम्ही
ठरवलं की हा आपला मार्ग नाही; आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि
त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करू." |
या खुलाशामुळे आता हे दोन लोक कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. |
याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली
दौऱ्यातील आसनव्यवस्थेवरून झालेल्या चर्चेवर पवार म्हणाले, "मी आणि फारुख अब्दुल्ला शेवटच्या रांगेत बसलो होतो आणि आमच्याजवळ उद्धव
ठाकरे होते. हे कारण नसताना चर्चेचा विषय बनवला गेला." |