"कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सुनावलं, मोदींच्या ७५व्या वाढदिवशीही केली प्रतिक्रिया"

कोल्हापूर | १८ सप्टेंबर २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार टीका केली. 
पवार म्हणाले, शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची जमीन नांगरणीशिवाय राहू नये म्हणून सोन्याचा फाळ दिला होता. मात्र आज अतीवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार पंचनामे कधी करेल आणि मदत कधी मिळेल याकडे शेतकरी आशेने पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.”

 महत्वाचे मुद्दे

  • शेतकरी प्रश्न: अतीवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; पंचनामे व मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा.
  • महाविकास आघाडी: नगरपालिका निवडणुकीत सर्वत्र एकत्र लढाई होईलच असे नाही, स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय होऊ शकतात.
  • मराठा-ओबीसी आरक्षण: सरकारच्या निर्णयांमुळे गावोगावी कटुता वाढतेय, दोन समित्यांमध्ये एकाच जातीचा सहभाग चुकीचा.
  • मोदींचा ७५वा वाढदिवस: जर मी ७५ नंतर थांबलो नाही, तर मोदींना थांबा असं म्हणण्याचा अधिकार मला नाही”पवार.