स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर १७ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप; आरोपी फरार'

नवी दिल्ली | २५ सप्टेंबर २०२५
देशाची आर्थिक राजधानी दिल्लीत शिक्षण घेत असलेल्या मुलींसोबत झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत.

 आरोपी स्वामी चैतन्यानंद

  • ६२ वर्षीय स्वयंघोषित बाबा पार्थ सारथी उर्फ स्वामी चैतन्यानंदवर १७ मुलींनी शारीरिक व मानसिक छळाचा आरोप केला.
  • तो सध्या फरार असून, पोलिसांनी मुंबईत त्याचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले.
  • देशातून पळून जाण्याची शक्यता टाळण्यासाठी लुकआऊट नोटीस जारी.

 आरोप काय आहेत?

  • मुलींना रात्री उशिरा खोलीत बोलावणे.
  • बेबी, आय लव्ह यू, तू खूप सुंदर आहेस” असे अश्लील मेसेज पाठवणे.
  • परीक्षा गुण कमी करण्याची धमकी.
  • सीसीटीव्हीद्वारे हॉस्टेल व मुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे.
  • होळीच्या कार्यक्रमादरम्यान मुलींना बळजबरीने स्पर्श करणे.

 विद्यार्थिनींचा आक्रोश

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा ७५ विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये राहत होत्या.
  • आरोपीने त्यांच्यावर नजर ठेवून त्यांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप.

 आर्थिक गैरव्यवहार

  • धार्मिक ट्रस्टची मालमत्ता खासगी वापरासाठी भाड्याने देऊन मोठा पैसा मिळवला.
  • त्या पैशातून वॉल्वो, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या खरेदी.
  • सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न.

 संस्थेची प्रतिक्रिया

संस्थेने ४ पानी निवेदन जारी करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलत असल्याचे सांगितले.

 हायलाइट्स

  • दिल्लीतील शिक्षण संस्थेत १७ मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण
  • आरोपी स्वामी चैतन्यानंद फरार, मुंबईत शेवटचे लोकेशन
  • मुलींना अश्लील मेसेज, गुण कमी करण्याच्या धमक्या
  • सीसीटीव्हीद्वारे विद्यार्थिनींवर नजर
  • पोलिसांची चौकशी सुरू, लुकआऊट नोटीस जारी